सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार राजाराम गरूड यांना जाहीर

0
771
Google search engine
Google search engine
कडेगांव / हेमंत व्यास :-
सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेली २० वर्षा पासुन कार्यरत असलेल्या आपल्या सांगली जिल्ह्याचे भाजपाचे माजी अध्यक्ष व सध्या भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले  राजाराम गरूड यांना नुकताच सामाजिक क्षेत्रात उल्लखनिय काम केल्यामुळे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
      राज्य शासनाने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त़्यांचा गौरव व्हावा व त्यांच्या कामाची दाद घ्यावी व इतरांना त्यापासुन प्रेरणा मिळावी म्हणुन राज्यशासनाने समाजभुषण पुरस्कार योजना सुरू केलीसन २०१७ -२०१८ या वर्षाच्या समाजभुषण पुरस्काराचे स्वरूप १५०००/रोख रक्कम व सन्मान चिन्ह असे आहे.हा पुरस्कार सोहळा मे महिन्याच्या पहील्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभ हस्ते व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
    राजाराम गरूड यांनी केलेली आंदोलने,मोर्चे व कित्येक गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत.त्या कामाची दखल घेवुन राज्य शासनाने त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कारासाठी निवड केली आहे. कडेगांव तालुक्यात राजाराम गरूड यांचे अभिनंदन होत आहे.