ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या वतीने *पाच दिवसीय बाल संस्कार शिबिराचे आयोजन*

0
913
Google search engine
Google search engine

वाशिम :- महेंद्रकुमार महाजन :

प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय वाशिम च्या वतीने पाच दिवसीय बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दि २५ ते २९ एप्रिल या पाच दिवसात हे शिबिर होणार असून वय वर्षे १० ते १५ वर्षे या वयोगटातील बालकांना अगदी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. शिबिराचे उदघाटन २५ एप्रिल च्या सकाळी ७:३० वाजता होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मीना दीदीजी अकोला तर प्रमुख अतिथि हरिभाऊक्षीरसागर,सत्यनारायणजी भड,माणिकजी भोयर,राजेशजी खटोड इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.शिबिराला मुख्य मार्गदर्शिका म्हणुन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वर्षा दीदी अकोला मार्गदर्शन करणार आहेत.बालकांना या शिबिरामूळे एकाग्रता वाढविणे,मनोबल वाढ,खेळत खेळत योगा, आंतरिक गुणांचा विकास, राजयोग मेडीटेशन इत्यादी उपयुक्त मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्या बालकाला या शिबिरात प्रवेशित करून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.इच्छुकांनी स्थानिक ब्रह्माकुमारीज वरदानी भवन सिव्हिल लाईन,सर्किट हाऊस च्या विरुद्ध बाजूस वाशिम येथे ०७२५२-२३३१०६ या क्रमांकावर संपर्क साधावा.