मध्यप्रदेश मधील गावठी दारू महाराष्ट्र मध्ये

0
897
Google search engine
Google search engine

शिरजगाव कसबा या ठीकाण वरून गावठी दारूची जोरदार वाहतूक सुरू

दिवसा ढवळ्या पोहचविले जात आहे गावठी दारू

राज्य उत्पादन शुल्क विभाग कधी करणार कार्यवाही.

चांदुर बाजार:-

पोलिसांच्या सतत च्या कार्यवाही मुळे आता गावठी दारू चा पुरवठा करणारे व्यावसायिक दिवस ढवळ्या गावठी दारू ही चिल्लर विक्रेत्या पर्यत पोहचवीत असल्याचे चित्र दिसून आले आहे.यामध्ये त्यांना आता शेती चा आणि कच्चा मार्ग द्वारे गावठी दारूची वाहतूक करणे सुरू केले आहे.

शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दी मध्ये येणाऱ्या पाळा गाव हे महाराष्ट्र च्या सीमेवरच्या गाव आहे.मात्र मध्य प्रदेश मधील खोमाई या गावामध्ये गावठी दारू निमिर्ती केली जाते.त्या नंतर पाळा, शिरजगाव कसबा वरून चांदुर बाजार तालुक्यातील अनेक गावांमध्ये यांच्या पुरवठा केला जातो.या च्या पोलीस विभाग कार्यवाही करत आहे.मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग का कठोर कार्यवाही करत नाही असे प्रश्न चिन्ह उभे आहे.