शिरजगाव कसबा येथील तलाठी लाच प्रकरण

0
950

👉🏻पैसे दिले नाही म्हणून गारपीट सर्वेक्षण मधून शेतकरी याला वगडले

👉🏻शेतकरी यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे तलाठी विरिद्ध तक्रार

👉🏻आपल्या नातेवाईक याना लाखोंचा लाभ तर उपविभागीय अधिकारी यांच्यावर सुद्धा आरोप

चांदुर बाजार:-

महसूल विभागाचा स्थानिक पातळीवर काम करणार आणि महत्त्वपूर्ण असलेला कणा म्हणजे तलाठी.नैसर्गिक आपत्ती आली असली की याचे उचित सर्वेक्षण करून त्याची माहिती वरिष्ठ तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी यांच्या पोहचवण्याचे काम तलाठी करीत असतो.त्यासाठी च त्याची नेमणूक केली जाते.मात्र चांदुर बाजार तालुक्यातील तलाठी कार्यलाय शिरजगाव कसबा येथील शेतकरी यांचे नाव पैसे न दिल्या मुळे सर्वेक्षण मध्ये टाकले नसल्याचे तक्रार त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.या तक्रारी मध्ये उपविभागीय अधिकारी अचलपूर हे शुद्ध पैसे घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात गारपीट झाली होती त्यामुळे शेतकरी याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शिरजगाव कसबा येथील काझी तलाठी यांनी शेतकरी याना संत्रा पिकाचे नुकसान दाखवायचे असेल तर 10000 द्या लागेल अशी मागणी केली असून स्वतःच्या नातेवाईक आणि गावातील खरे नुकसान ग्रस्त शेतकरी सोडून ,इतर दुसरे शेतकरी यांच्यासोबत 50-50 फार्मूल वापरून शासनाचे लाखो रुपयांचे अनुदान लाटले आहे.अशी तक्रार शेतकरी नाजीमबेग बशीरबेग रा.शिरजगाव कसबा यांनी जिल्हा धिकारी यांचे कडे केली आहे.

अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी काझी तलाठी यांच्या कडून पैसे घेतात म्हणून त्यांच्या कडे तक्रार केली नसल्याचे त्यांनी आपल्या तक्रार मध्ये म्हटले आहे.

*बॉक्स*
*सरकार करून वेतन घेत असताना शेतकरी याना पैशाची मागणी करणे योग्य की अयोग्य अशी चर्चा चांगलीच रंगत असून.या तक्रार वर कार्यवाही होणार ही पैसा मुळे प्रकरण गुलदस्त्यात अडकून राहणार हे पाहावे लागेल.तर शेतकरी हे* आपल्या न्याय मिळावा ही अपेक्षा ठेवून आहे.*