पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या धडाकेबाज कार्यवाही

0
878

👉🏻परी.पोलीस अधीक्षक यांच्या अवैध धंदे वर धडक कार्यवाही

👉🏻पोलीस स्टेशन मधील अनेक विभाग मध्ये बदल,

👉🏻अधीक्षक याना भेटीसाठी घ्यावी लागते परवानगी.,अवैध वाहतूक आणि अतिक्रमण प्रश्न कायम

चांदुर बाजार:-

परिचालक म्हणून चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे आलेले तरुण आयपीएस अधिकारी समीर शेख यांनी धडकीच्या कार्यवाही मुळे अवैध धंदे वाल्यांना चागला घाम फुटला आहे.तरी स्थानिक पोलीस स्टेशन मधील काही विभाग सुद्धा त्यांनी कर्मचारी यांच्या बदली मुळे बदल केला आहे.तसेच समीर शेख याना भेटायचे असल्यास रजिस्टर नोंदणी पद्धत सुरू केली आहे.त्यामुळे त्यांची काम करण्याची एक वेगळीच पद्धत असल्याचे चित्र तयार झाले आहे.

चांदुर बाजार पोलीस येथे याच्या अगोदर 4 परिचालक पोलीस अधीक्षक आले पण त्यांनी कधीच स्वागत कक्ष तयार केले नाही. त्यामुळे सामान्य लोक शुद्ध त्यांना भेटू शकत होते आणि आपल्या समस्या सांगत होते.भेटण्या अगोदरच प्रश्नच डोगर उभा राहत असल्याचे चित्र दिसत आहे.मात्र ठाणेदार समीर शेख यांनी नवीन पद्धत अवलंबली असल्याचे दिसून येत आहे.

दिनांक 16 एप्रिल ला चांदुर बाजार पोलीस स्टेशन चा कार्यभार ठाणेदार सुनील वायदंडे यांच्या करून 3 महिने परिचालक म्ह्णून असलेले आयपीएस अधिकारी समीर शेख यांनी घेतला. पोलीस स्टेशन चा कार्यभार स्वीकारताच त्यांनी पोलीस स्टेशन मधील अंतर्गत विभाग बदल केले.तसेच शिस्तबद्ध राहण्याचे कर्मचारी याना सांगितले.त्यामुळे सर्व कर्मचारी हे वर्दी मध्ये दिसत आहे.

तसेच त्यांनी दोन ठिकाणी जुगार रेड केली असून मोठ्या प्रमाणात जुगार साहित्य ,मोटरसायकल जप्त केल्या.तसेच या कार्यवाही दरम्यान त्यांनी गांजा सुद्धा पकडला.त्यांच्या या कार्यवाही मुले अवैध धंदे करणारे यांचे डोळे उघडले आहे.

*बॉक्स*
*वाहतुकीचा आणि अतिक्रमण चा प्रश्न मात्र कायम असल्याने या कडे समीर शेख ठाणेदार पोलीस स्टेशन चांदुर बाजार कोणते पाऊल उचलणार हे पाहावे लागतील.*

तसेच तालुक्यात होणार गुटखा विक्री,अवैध जनावर वाहतूक,अवैध वाळू,अवैध पणे मास विक्री,अवैध गावठी दारू,या च्यावर ते आळा घालण्यात कितपत यशस्वी ठरतात हे पाहावे लागेल. किंबहुना तशी चर्चा सुद्धा त्यांच्या कार्यवाही मुळे तालुक्यात रंगत आहे.