विविध उपक्रमांनी संजय मोटवानींचा वाढदिवस साजरा – भाजपा कार्यकर्ते व मित्र परिवाराचे आयोजन

0
632
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान 

      स्थानिक नगर परीषदमधील नगरसेवक तथा गटनेता संजय मोटवानी यांचा वाढदिवस गुरूवारी विविध सामाजिक उपक्रमांनी भाजपा कार्यकर्ते व मित्र परिवारातर्फे साजरा करण्यात आला.

      सर्वप्रथम सकाळी ग्रामिण रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर चांदूर रेल्वे तालुका वूशु असोसिएशन तर्फे उन्हाळी शिबिर अशोक कॉलेज मध्ये सुरू आहे. या शिबिरातील मुलांना सकाळी नास्त्याचे व सायंकाळी बिस्कीटचे वाटप करण्यात आले. या शिबीरातील चिमुकल्यांनी पुष्पगुच्छ देऊन संजय मोटवानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

        यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रसन्ना पाटील, नगरसेवक अजय हजारे, बबलू पूरसाम, सौ. निलीमा शर्मा, सौ. सूरेखा तांडेकर, सौ. दीपाली मिसाळ, सौ. लता बागडे, मून्ना शर्मा, सचीन लांजेवार, गूड्डू बजाज, केशव वंजारी, विलास तांडेकर, रविंद्र उपाध्याय, प्रमोद नागमोते, बबनराव गावंडे, किशोर शिरसागर, पप्पी पटले, बाबा चव्हान, विजय मिसाळ यांसह असंख्य कार्यकर्ते व मित्र मंडळी उपस्थित होते.