ओबीसी जनगणना परिषद संविधानिक न्याय यात्रेचे चंद्रपुरात स्वागत

0
617
Google search engine
Google search engine

चंद्रपूर :-
ओबीसी जनगणना परिषदेची संविधानिक न्याय यात्रेचे चंद्रपुर शहरात आज (दि.२७) ला सकाळी ११ वाजता जनता शिक्षण महाविद्यालयाच्या श्री-लिला सभाग्रुहात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, समन्वयक सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, प्रा. रमेश पिसे, मायाताई गोरे, काळे ताई, दिनेश चोखारे, नितीन पोहाणे, आदि उपस्थित होते.
संविधानिक न्याय यात्रेमधील मान्यवरांचे प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे व सचिन राजूरकर यांनी स्वागत केले.
सदर यात्रा समता भूमी वरुन दि. ११ एप्रिल पासून चैत्यभूमी मार्गे दिक्षाभूमी वरुन चंद्रपूरला आली.
यावेळी मान्यवरांनी ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावे, व आदि पुर्वापार ओबीसींच्या मागण्यांवर प्रकाश टाकत आवाज बुलंद करण्यात आला.
स्वागत कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा शाखेचे अध्यक्ष नितीन कुकडे, व आभार सुधीर चवरे यांनी मानले.
कार्यक्रमाला जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी तथा ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.