जल बचतीसाठी भुमी फाउंडेशनचा पुढाकार – बसस्थानकावरील फुटक्या नळांची केली दुरुस्ती

0
782
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके :-

वाढत्या उन्हामुळं सर्वञ पाणीटंचाई जाणवत आहे.अश्यातच आकोट बसस्थानकावरील पिण्याचे पाण्याच्या नादुरुस्त नळातुन सतत पाणी वाहत होते.

ही बाब भुमिचे अध्यक्ष तुषार अढाऊ व पञकार संतोष विणके यांच्या निदर्षनास आली.गेल्या ३ दिवसांपासुन या नळांमधुन पाणी वाहणे सुरुच होते.त्यामुळं पाणी वाचावं म्हणुन भुमीच्या सदस्यांनी ही नादुरुस्त नळं तात्काळ दुरुस्त करायचं ठरवलं आणी भुमीच्या सर्व सदस्यांनी बसस्थानकावरील नादुरुस्त फुटक्या नळांकडे धाव घेत नळ दुरुस्ती करणाऱ्या कारागीराच्या हातुन नवीन नळ बसवुन घेतले.त्यामुळं भुमीच्या पुढाकारातुन अवास्तव वाया जाणारं अमुल्य पाणी वाचावता आलं.महाराष्ट्रात सर्वञ पाणी वाचवण्यासाठी तुफान आलं असतांना आपल्या अवती भवती होणाऱ्या पाणी गळतीकडे माञ सर्वाचंच दुर्लक्ष होत असल्याची बाबही यानिमित्याने उजागर झाली आहे.त्यामुळं पाण्याच्या होणाऱ्या अवास्तव गळतीसाठी लवकरच भुमी फाउंडेशन मोहीम सुरु करणार आहे.या मोहीमेसाठी फुटक्या नळांसह नवीन नळांसाठी मालाणी एन्टर प्रायजेसच्या अतुल मालाणी यांनी मोफत नळं पुरवलीत.भुमीच्या या पुढाकारामुळं धो धो वाहणारं पिण्याचं लाखमोलाचं पाणी वाचवल्या गेलं.त्यामुळं सेलीब्रिटीपेक्षा मोठं काम भुमीच्या सर्व टीमनं केल्याची भावना बसस्थानकावरील शेकडो प्रवाश्यांनी व्यक्त केली.या नळदुरुस्ती धडक मोहीमेत भुमी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार अढाऊ सचिव चंचल पितांबरवाले,पञकार संतोष विणके ,सुनिल मस्करे ,हर्षल बहादुरे,अगस्ती ठाकुर,पंकज अंबुलकर,यांनी पाणी वाचवण्यासाठी धडपड केली .या निमित्ताने पाणी हे श्रमदान करुनच नव्हे तर आपल्या अवती भवती होणाऱ्या नासाडीतुन वाचवता येते.हे दिसुन आले.भुमीच्या या कार्याचं आगार प्रमुख दिपक जोशी यांनी भुमीच्या कार्याचं कौतुक करत नळांच्या देखभाल दुरुस्ती कडे लक्ष देऊ असे सांगीतले.