*वॉटरकपसाठी चिंचखेड लोहारीत भुमी फाउंडेशनचे श्रमदान*

0
662
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके :-

महाराष्ट्रात सर्वञ तुफान आलं असतांना आकोट तालुक्यातील गावांगावांमध्ये पाणी अडवण्यासाठी स्पर्धा स्पर्धा लागली आहे.या स्पर्धे अंतर्गतच दि.२५ ला भुमी फाउंडेशनच्या सदस्यांनी आकोट जवळील चिंचखेड येथे सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत उत्स्फुर्त श्रमदान करत अमुल्य पाण्यासाठी घाम गाळला.

वाॕटरकप साठी संपुर्ण चिंचखेड मध्ये तुफान आलं आहे.दररोज सकाळी व संध्याकाळी उशीरा पर्यंत गावातील स्ञी पुरुष आबालवृद्ध श्रमदान करत आहेत.गेल्यावर्षी जीतापुरमध्ये श्रमदान करत भुमीने जीतापुरला पुरस्कार मिळावा म्हणुन भरपुर श्रमदान केले.त्यामुंळं चिंचखेड गावातील नागरीकांनी तांञीक मार्गदर्शन सह श्रमदानासाठी भुमीच्या चमुला निमंत्रण दिले होते.हे निमंञण स्विकारत भुमीने आधी श्रमदान केले .श्रमदाना नंतर उशीरा गावातील मंदीराजवळ गावकऱ्यांनी जनजागृतीसाठी मोठी सभा घेतली.या सभेला भुमीचे अध्यक्ष तुषार अढाऊ सचिव चंचल पितांबरवाले,सरपंच प्रदीप सपकाळ ग्रा.सदस्य ठाकरे,गावातील प्रतीष्ठीत नागरीक रुपराव म्हैसने,यांच्यासह जेष्ठ शिक्षक डी. ओ . म्हैसने ,शोभाताई म्हैसने .यांची विशेष उपस्थीती होती.सभेच्या सुरवातीला भुमिच्या वतीने पञकार संतोष विणके व सुनिल मस्करे यांनी श्रमदाना विषयी मनोगत व्यक्त केले.दरम्यान शोभाताई म्हैसने यांनी गावातील श्रमदानाविषयी माहीती दिली.त्यानंतर तुषार अढाऊ यांनी स्पर्धेच्या मुल्यांकना संदर्भात माहीती दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना बक्षिस मिळविण्यासाठी प्रोत्साहीत केले.तसंच पाणी अडवणे हेच सर्वात मोठं बक्षिस आसल्याची भावना व्यक्त केली.सभेसह श्रमदानासाठी भुमी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार अढाऊ सचिव चंचल पितांबरवाले,पञकार संतोष विणके ,ॲड.ऋचा ठाकुर ,कमलेश राठी ,हर्षल बहादुरे, पंकज अंबुलकर,सुनिल मस्करे ,अमोल पवार आदींनी गावकऱ्यांसह श्रमदान केले.