*लोकसहभागातून फुलणार डांगरखेडचे हिरवे रान – पाणी फाऊंडेशन अंतर्गत न प कर्मचा-यांचे श्रमदान*

0
1115

आकोट ः संतोष विणके :-

पाणी फाऊंडेशन द्वारा राज्यातीलल  कप स्पर्धेत आदीवासी ग्राम डांगरखेड येथील जलसंधारणाच्या कामात सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हा डोंगर परिसर पाणीदार करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आकोट पालिकेच्या मुख्यअधिकारी गीता ठाकरे यांनी केले

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या डांगरखेड येथील श्रमदानासाठी आलेल्या ग्रामस्थ,स्वयंसेवी तथा नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व शिक्षकवृंदाशी संवाद साधतांना मुख्यअधिकारी ठाकरे बोलत होत्या. लोकसहभागातून डांगरखेडचे हिरवे रान फुलवू.त्यासाठी शासकीय कर्मचारी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक ,स्वयंसेवी संस्था, युवक युवतींनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रा संदिप बोबडे ,पाणी फाऊंडेशन चे तालुका समन्वयक यांनी वाॕटर कप स्पर्धेची माहीती दिली.यावेळी ग्रामपंचायत सरपंच दोलाराम तोटे उपस्थित होते.

दरम्यान जैन संघटनेद्वारा पुरविण्यात आलेल्या प्रोकलॕन्ड मशीन द्वारा येथील कामाचा भूमिपुजन गीता ठाकरे यांचे हस्ते पार पडला. या द्वारे डीप सीसीटीचे १०घनमिटरचे कामाचे उद्दिष्ट आहे यासाठी लागणा-या डिझल साठीचा खर्चाची व्यवस्थेत नगरपरिषद अधिकारी कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षक यांनी मोठे योगदान दिले आहे.

पाणी फाऊंडेशन अंतर्गत डांगरखेड ग्राम दत्तक घेवून नोडल एजन्सी म्हणून मुख्यअधिकारी गीता ठाकरे आकोट नगरपरिषदे अधिकार व कर्मचारी जाणिवपूर्वक महत्वाची भूमिका पार पडणार यामधून येत्या पावसाळ्यात २०हजार कोटी लिटर पाण्याचे भूगर्भात पूनर्भरण होणार आहे.

दि. २७ला स ७ते१२पर्यंत श्रमदानातून पानलोट स्थळी बंधारा करण्यात आला यावेळी पालिकेचे प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर ,पाणी पुरवठा अधिकारी अभियंता रोशन कुमरे, कर अधिक्षक गौरव लोंदे, अभियंता, विद्युत अभियंता नंदन गेडाम,कैलास मेटवाणी, आरोग्य अधिक्षक चंदन चंडालिया,आरोग्य निरिक्षक सर्फराज खान ,कार्यालय पर्यवेक्षीका मयुरी जोशी,निकीता देशमुख ,निखिल गुजर,देशमुख,सशिअ समन्वयक रितेश निलेवार,,मुख्याध्यापक अंबादास लाघे,मुक्तार शहा,राजेंद्र लांडे,असिफ शहा,अ.आरिफ,रघुनाथ बेराड,फैजुल हक,अयुब खान,सलीम अहमद,कलीम अहमद,आसिम अहमद नगरपरिषद देशमुख शमुख ,जुनैनोद्दीन, विनय शिंदे,निजामोद्दीन,विनोद तेलगोटे,आदीसह नगरपरिषद कर्मचारी शिक्षक तथा ग्रामस्थ सहभागी झाले होते.

दर मंगळवार,शुक्रवारला डांगरखेडच्या जलसंवर्धन श्रमदानात नगरपरिषदेचा मोठा सहभाग राहणार आहे.