१ मे महाराष्ट्र दिनी टोल नाक्यावर उसळणार जनआक्रोश – नांदगाव पेठ टोल नाक्याविरुद्ध पुन्हा कृती समितीचे एक पाउल पुढे

0
820

*अमरावतीकरांना पोलीस तक्रारीसाठी ही भरावा लागतो आर्थिक भुर्दंड.*

मोर्शी : नांदगाव पेठ टोलनाक्याविरोधात आतापर्यंत मोर्शी-वरुड कृती समितीने टोलमुक्ती निवेदनावर १० हजारापेक्षा अधिकनागरिकांनी स्वाक्षरी केली, त्यासोबतच या टोलविरुद्ध ग्रामपंचायतींनी ठराव सुद्धा घेतले. याबाबतचे नागरिकांनीसमितीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह स्थानिक सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींकडे निवेदने सादर केली आहेत. त्यासोबतच अमरावती शहरातील शेगाव, रहाटगांव, अर्जुन नगर इत्यादी वसाहतीसह नागरिकांना नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायची असल्यास ४-५ किलोमीटरच्या अंतरासाठी सुद्धा टोल नाक्यावर १६० रुपये भुर्दंड भरावा लागतो. अशा अनेक तक्रारी टोल नाक्याविरुद्धात येत असतांना निगरगट्ट सरकारच्या धोरणामुळे अद्यापपर्यंतनागरिकांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे येत्या १ में महाराष्ट्र दिनी सकाळी ९.३० वाजता सत्ताधारी व टोल नाक्याविरुद्ध कृती समितीने एक पाऊल पुढे टाकले असल्याने या आंदोलनाला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी समर्थन देत पुन्हा रणशिंग फुंकले आहे. या टोल नाक्याचा राज्यातील पत्रकारांनाही फटका पडत असल्याने मोर्शी – वरुड तालुका पत्रकार संघाने या आंदोलनाला समर्थन दिले आहे. टोल नाक्यावरील भुर्दंड सर्वांसाठी असून तो फक्त एका व्यक्तीसाठी नाही, त्यामुळे या आंदोलनात अमरावती शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसह पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीच्या जागृत नागरिकांनी केले आहे.

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपेठ येथेआयआरबीने टोल उभारून वसुली सुरू केली तेंव्हापासून मोर्शी व वरूड येथून ये-जा करणाऱ्या वाहनांनाही टोल भरावा लागत आहे. त्यांना एकीकडचा ९० रुपये तर दुसरीकडचा त्यापेक्षा अधिक टोलचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. एवढंच नाहीतर अमरावती शहरात येत असलेल्या नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शेगाव, रहाटगांव, अर्जुन नगर इत्यादी वसाहतीसह परिसरातील भागात चोऱ्या, अपघात व इतर प्रकरणी नागरिकांनी नुसतं पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी जायचे म्हटले तर टोल धारक वाहन धारकांकडून ६० किलोमीटरचा जाने-येण्याचा टोल आकारतात, त्यांना सर्व वास्तविकता सांगूनही ते वेठीस धरून टोल आकारणी शिवाय जावू – येऊ देत नाही, हि आर्थिक लुट अत्यंत अन्यायकारक व क्रौध निर्माण करणारी आहे. घरापासून ४ – ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशन पर्यंत जाण्या-येण्या करिता १६० रुपये नाहक आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे. आणि तो पूर्णत: अवैध आहे. या चुकीच्या धोरणासाठी अनेकांनी केंद्रीय मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, लोकप्रतिनिधींना निवेदने दिलीत पण त्याचा काहीच फायदा झाला नाही, त्यामुळेटोलमुक्तीसाठी नांदगाव पेठ येथील टोलनाका कार्यालयात मोर्शी-वरुड कृती समिती तसेच वरूड तालुक्यातील संघर्ष ग्रुप व ट्रान्सपोर्ट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसा अगोदरठिय्या आंदोलन सुद्धा केलीत, परंतु नेहमी सारखे आश्वासन देत आंदोलन हाणून पाडण्यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी व अधिकारी यशस्वी ठरले. परंतु यावेळीच्या आंदोलन आश्वासनावर ठंड पडणार नसून एकदाच होऊन जाऊ द्या परिस्थितीचे असणार असल्याचे चित्र दिसत असल्याने पोलीस विभाग सर्तक झाला आहे. त्यासोबतच अमरावती शहरातील भाग नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतून काढून गाडगे नगर पोलीस ठाण्यात विलीन करावा अन्यथा नांदगाव पोलीस स्टेशन महानगर पालिका क्षेत्रात प्रस्तापित करा किंवा नांदगाव पेठ हद्दीतील टोल नाका नागपूर रोडकडे १० किलोमीटर पुढे करावा असे हि जिल्हाधिकारी व पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.