अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बनवणारे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री  यांच्या कुटुंबियांकडून निवडणुकीत यश मिळण्यासाठी यज्ञयाग

0
780
Google search engine
Google search engine

कर्नाटक विधानसभेची निवडणूक

  • स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शेवटी हिंदूंचे धार्मिक विधी आणि देव यांनाच शरण यावे लागणारे काँग्रेसचे ढोंगी पुरोगामी मुख्यमंत्री !
  • अशा वेळी सिद्धरामय्या यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना निवडणूक जिंकण्यासाठी टिपू सुलतान नाही किंवा मुसलमानांची मतेही नाहीत, तर हिंदूंचे देवच उपयोगी पडत आहेत, हे लक्षात घ्या !

बेंगळुरू – कर्नाटक विधानसभेची निवडणूक मे मासात होणार आहे. याचा सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रसार-प्रचार चालू आहे. ही निवडणूक कठीण जात असल्याने काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे कुटुंबीय कर्नाटक अन् केरळ येथील ज्योतिषांच्या सल्ल्याने यज्ञयाग करू लागले आहेत, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. (अंनिसवाले यावर काही बोलणार का ? – संपादक) सिद्धरामय्या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहेत; मात्र त्यांना दोन्ही ठिकाणी जिंकण्याविषयी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे ते आता देवाला शरण गेल्याची चर्चा राज्यात चालू आहे. गेल्या १५ दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचे यश आणि दोषनिवारण यांसाठी त्यांचे कुटुंबीय राज्यात, तसेच केरळमध्ये विविध यज्ञयाग करत आहेत.

१. काही वर्षांपूर्वी चारचाकी वाहनावर कावळा बसल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांनी केरळ येथील ज्योतिषाला संपर्क करून काही दोषनिवारण विधी केले होते. आताही ते या ज्योतिषांच्या सांगण्यावरून विधी करत आहेत.

२. सिद्धरामय्या यांच्या धर्मपत्नी केरळ, नंजनगुडू, बेंगळुरू येथील विविध ठिकाणी गेल्या ३-४ दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमात व्यस्त झाल्या आहेत.

३. नंजनगुडू येथे ३ दिवसांपूर्वी सकाळी नवग्रह शांती होम पूर्ण करण्यात आला; परंतु या आणि यापूर्वीच्या कोणत्याही विधीला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. यात धर्मपत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्य सहभागी झाल्याचे सूत्रांकडून समजते.

४. बेंगळुरू येथे ३ दिवसांपूर्वी कृत्रिम दोष निवारणासाठी उडुपीच्या वैदिकांनी होम हवन केल्याचे समजते.