जलसंधारणाच्या कामांसाठी उमरावासी करणार महाराष्ट्र दिनी आत्मदहन

0
917

आकोटः संतोष विणके:-

आकोट तालुक्यातील उमरा गावातील जलसंधारणाच्या कामांसाठी जलसंधारण मंञ्यांसह ,लोकप्रतीनिधींच्या पञांना प्रशासन कचरा पेटी दाखवते आहे.त्यामुंळ पाणी वाचवण्यासाठी तुफान आलेलं असतांना प्रशसनाच्या दिरंगाईमुळं उमरा येथे पाणी पेटण्याची चिन्हे आहेत.एकीकडे उमरा गावातील लोकांनी श्रमदानातुन वॉटरकप मध्ये प्रभावी काम करत ५ लाखाचा पुरस्कार पटकावला.

तर दुसरीकडे ज्या विभागाकडे जलसंधारणाची जबाबदारी आहे ते माञ टाळाटाळ करतआहेत.प्रशासनाच्या उडवाउडवीला कंटाळुन येत्या १ मे ला उमरा ग्रामवासी राजेंद्र मावलकर हे आत्मदहन करणार असल्याचं त्यांनी प्रशासनाला कळवलं आहे.तरी ढीम्म प्रशासन पाण्यासाठी मरण्याची वाट पाहत आहे.उमरा शिवारातील नाल्यांचे खोलीकरण झाले असुन नाल्यांमध्ये डोहांची निर्मिती केली आहे.परंतु या दोन डोहांच्या मध्ये असलेल्या भिंती या मातीच्या असल्याने वाहुन गेल्या आहेत.त्यामुंळ या नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधल्या शिवाय पाणी अडणार नाही व शासनाने केलेले खोलीकरण जाईल .यावर जलसंधारण मंञी राम शिंदे यांनी संबधीत विभागाला ४/४/२०१८ रोजी सिमेंट बंधारें बाबत आदेश पञ दिले.त्यापुर्वी२१/०३/२०१८ ला जलसंधारण सचीव एकनाथ डवले यांनीही अवगत केले होते .त्यामुळं एवढे मंञी ,पालकमंञी लोकप्रतीनीधी जवळ पाठपुरावा करुनही संबधीत विभाग लक्ष घालत नसल्याने नाईलाजाने दि.१ मे ला आत्मदहन करणार असल्याचं राजेंद्र मावलकर यांनी प्रशासनाला कळवलं आहे.विशेष म्हणजे उमरा येथे १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन शेतीला पाणी नाही म्हणुन आणखी आत्महत्या होण्याची वाट शासन बघत आहे काय.उमरा येथील सिमेंट बंधारे मागणीची तक्रार थेट मुख्यमंञ्यांकडे आपले सरकार वरही करण्यात आली आहे.हे विशेष.त्यामुळं या प्रकरणी शासनाच्या जीवावर प्रशासन शिरजोर अस चिञ दिसुन येत आहे.