भाजप राममंदिर उभारू शकत नाही ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती जी महाराज

0
752

लक्ष्मणपुरी –

 

‘केंद्रात आमची सत्ता असल्यामुळे आम्ही अयोध्येत राममंदिर उभारू’, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्याकडून सांगण्यात येते; परंतु घटनेनुसार केंद्र सरकार हे ‘निधर्मी’ आहे. परिणामी हे सरकार राममंदिर, मशीद किंवा गुरुद्वारा उभारू शकत नाही. केवळ आमच्यासारखे रामभक्तच राममंदिर बांधण्यास समर्थ आहेत, असे प्रतिपादन द्वारका आणि ज्योतिष या पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शंकराचार्यांनी यापूर्वीही असे म्हटले होते. ते पुढे म्हणाले, ‘आम्ही लोकांच्या दु:खाचे निवारण करतो’, असा प्रचार ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून करण्यात आला. भारतात चमत्कारांवर विश्‍वास असणारे लोक कुणालाही ‘संत’ करतात. ख्रिस्ती धर्मियांमुळे हा पायंडा पडला. त्यामुळेच आसारामबापू आणि रामरहिम यांना लोकांनी मोठे केले.