राजधानीत ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा

402

नवी दिल्ली- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिन महाराष्ट्र सदन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रधान सचिव तथा निवासी आयुक्त श्रीमती आभा शुक्ला यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे ध्वजारोहण करण्यात आले.

निवासी आयुक्त कार्यालय व नवीन महाराष्ट्र सदन येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत होऊन उपस्थितांनी ध्वज वंदन केले. या कार्यक्रमास निवासी आयुक्त तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, सहायक निवासी आयुक्त इशू संधू, सहायक निवासी आयुक्त अजितसिंग नेगी, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्रातून आलेले व महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागंत, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी –कर्मचारी आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवंर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.