महाराष्ट्रदिनी पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण @mahadevjankar1

0
1085
Google search engine
Google search engine

भंडारा- 1 मे, महाराष्ट्रदिनी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदान येथे मुख्य कार्यक्रमात राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. यावेळी ना. महादेव जानकर यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, पोलीस अधिक्षक विनीता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी शेखर धकाते, उपविभागीय अधिकारी रविद्र राठोड, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे , जी.जी. जोशी, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, तहसिलदार संजय पवार व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य ध्वजारोहणानंतर ना. जानकर यांनी पोलीस पोलीस परेडचे निरिक्षण केले व मानवंदना स्विकारली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या नेतृत्वात परेड संचलन करण्यात आले. पोलीस विभाग, महिला व पुरुष पोलीस, गृहरक्षक दल, दामिनी पथक, श्वान पथक पोलीस माहिती चित्ररथ यावेळी पथसंचलनात सहभागी झाले होते. परेड संचलनानंतर ना. महादेव जानकर यांनी उपस्थित स्वातंत्रय सैनिक लोकप्रतिनिधी, अधिकारी व पत्रकार यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.