गौतम जवंजाळ यांच्या तिसऱ्या उपोषणाला सुरूवात – फौजदारी कारवाईशिवाय मागे न हटण्याचा निर्धार

0
761
Google search engine
Google search engine
राजकीय दबावामुळे फौजदारी कारवाई होत नसल्याचा आरोप
अधिकारी आरोपींच्या नावाचे तोरणासारखे बांधलेले बॅनर ठरले लक्षवेधक
चांदूर रेल्वे  – (शहेजाद खान) 
       गरीब नागरीकांसाठी शासन नवनवीन योजना काढत असतात. यांमधील एक योजना म्हणजे घरकुल योजना. मात्र या घरकुलांचा लाभ ज्यांना आवश्यकता नाही अशांनी लाटला. त्यामुळे या विरोधात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील सामाजिक कार्यकर्ते गौतम अण्णाजी जवंजाळ हे आज महाराष्ट्रदिनापासुन तिसऱ्यांदा उपोषणाला बसले असुन यंदा फौजदारी कारवाई झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. अधिकारी आरोपींच्या नावाचे तोरणासारखे बांधलेले बॅनर लक्षवेधक ठरले.
       सर्वसामान्य लोकांना वरदान ठरणार्‍या घरकुल योजनेत गरजू गोरगरिबांना हक्काचे घर प्राप्त होणे आवश्यक होते. परंतु स्थानिक नगर परीषदमध्ये या योजनेत खरे लाभार्थी पात्र ठरविण्याऐवजी अनेक अपात्र लाभार्थ्यांना अनेक वेळा कागदपत्राची योग्य छाननी न करता परस्पर लाभ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे खरे लाभार्थी कित्येक वर्षांपासुन घरापासून वंचित राहिले आहेत. चांदुर रेल्वे नगर परीषदमधील अनेक वर्षांपासुन गाजत असलेल्या या घरकुल घोटाळ्याला बाहेर काढण्यासाठी गौतम अण्णाजी जवंजाळ गेल्या १२ वर्षापासुन सतत लढा देत आहे. घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाईसाठी गौतम जवंजाळ यांनी दोन वेळा उपोषण तसेच आंदोलने केली. याबाबत पुरावे दिले, मंत्रालयातुन पत्र आले, जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आले, अहवाल तयार झाला यावरुन भ्रष्टाचार असल्याचे सिध्द झाले. मात्र दोन वर्षापासुन केवळ राजकीय दबावामुळे अद्यापही कोणावरही फौजदारी कारवाई झालेली नसल्याचा आरोप जवंजाळांनी केला आहे.
       असे असले तरी त्यांनी हार न मानता आपला लढा सतत सुरूच ठेवला असून आज मंगळवारपासुन पुन्हा तिसऱ्यांदा स्थानिक नगर परीषदेच्या प्रवेशव्दारासमोर उपोषणाला बसले आहे. या उपोषणादरम्यान जिल्हाधिकारी यांच्या चौकशी अहवालानुसार अधिकारी आरोपींच्या नावाचे लहान लहान बॅनर बनवून उपोषणस्थळी तोरणासारखे बांधल्यामुळे ते उपोषणस्थळाचे आकर्षण बनले आहे. सद्यातरी प्रशासनात एकच खळबळ उडाली असल्याचे चित्र