अकोट शहर पोलिसांचे अवैध धंद्यावर धाड सत्र सुरूच – जुगारासह अवैध दारु पकडली

0
794
Google search engine
Google search engine

आकोट :प्रतीनीधी –

मागील एक आठवड्या पासून अकोट शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे नेतृत्वात शहरात अवैध धंद्यावर धाड सत्र सुरू आहे. त्यामुळं अवैध धंदे करणाऱ्या मध्ये खळबळ निर्माण झाली आहे. काल रात्री दि.३० एप्रिल ला साहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलीस कर्मचारी संजय घायल, जितेंद्र कातखेडे, राहुल वाघ, नासिर शेख, मंगेश खेडकर, ह्यांचे पथकाने मिळालेल्या माहिती वरून अंबिका नगर अकोट येथे जुगारावर धाड टाकली.यावेळी सट्टा पट्टी साहित्य व नगदी 4250 रुपये आरोपी पवन शिवशंकर इंगोले ह्याचे कडून जप्त करण्यात आले, त्याचे व जुगार अड्डा चालविणारे नितिन अप्पा ह्यांचे विरुद्ध पोलिस स्टेशन अकोट शहर येथे गुन्हे दाखल करण्यात आले, तसेच स्थानिक आठवडी बाजार येथे पवन जगन मुराई हा अवैध रित्या दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळल्यावरून पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय घायल, पठाण,राठी,सोळंके ह्यांचे पथकाने त्याचेवर रेड करून त्याचे ताब्यातून 20 बॉटल देशी दारू किंमत 1000 रुपये,मिळून आले. त्याचे विरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान अवैध धंद्या विरुद्ध धडक कार्यवाही सुरूच राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितलेले.