रेल्वे पटरीवर ३ वर्षाचा मुलगा बेहोश स्थितीत आढळला

0
1306
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शाहेजाद खान ) 
        चांदूर रेल्वे येथील रेल्वे पटरीवर तीन ते साडेतीन वर्षांचा मुलगा बेहोश स्थितीत आढळला. काही लोकांनी त्या बालकाला १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने अमरावती जिल्हा रूग्णालयात भरती केले आहे.
        प्राप्तमाहितीनुसार, बुधवारी दुपारच्या दरम्यान एक तीन ते साडेतीन वर्षांचा बालक काही लोकांना बेशुध्द स्थितीत दिसला. पायावरील जखम वगळता इतरत्र कुठेही अंगावर जखमा आढळल्या नाही. सुरूवातीला नागरीकांनी जवळपास त्याच्या पालकांना शोधले. मात्र कोणीही आढळून आले नाही. त्यामुळे विलंब न करता १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बोलावून बालकाला अमरावती जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सद्या बालकाची स्थिती थोडी चांगली झाली असून कोणतीही माहिती देण्यास मात्र असमर्थ ठरल्याचे समजते. पोलीसांनी या बालकाचा फोटो सर्व पोलीस स्टेशनला पाठविला असून सोशल मिडीयावर सुध्दा व्हायरल करण्यात आला आहे. पोलीस बालकाच्या पालकांचा शोध घेत आहे.