वाहन चालक-मालक संघटनेने विरूळ चौकात सुरू केली पाणपोई

0
713
चांदूर रेल्वे – (शाहेजाद खान ) 
       तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच शहरातील संघर्ष वाहन चालक-मालक संघटना सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढे आली असुन विरूळ चौकात गेल्या एका महिण्यापासून पाणपोई सुरू केली आहे.
      दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच झालला आहे. असे असतांना या विरूळ चौकातील पाणपोईवर नागरीक थांबून रस्त्याने जाता-येता घशाला पडलेली कोरड दूर करताना चार घोट गार पाणी घशाखाली उतरवत असून त्यानंतर त्यांना हायसे वाटत आहे. ही पाणपोई सूरू करण्यासाठी सेवेकरी संघर्ष वाहन चालक मालक संघटना अमरावती जिल्हाध्यक्ष अविनाश कैलकार, गजानन चोरे, आकाश गावंडे, राहुल केवट, संजय शिरकरे, नितीन हटवार, सचिन जरे, प्रवीण मानवटकर, शुभम वेडे, स्वप्निल मोहोड, अमित पाचकवडे, चुन्नुभाई तसेच विरूळ चौकातील ऑटो युनियनचे सदस्य आदींनी पुढाकार घेतला होता.