गतिमान आणि पारदर्शक कारभारासाठी शाहरुख मुलाणींकडून ग्रामपंचायत अधिनियम भेट : राज्यातील पहिली घटना

0
1071

सांगोला. ( प्रतिनिधी ) ― राज्य शासनाच्या धोरण प्रमाणे गतिमान आणि पारदर्शक कारभार ग्रामपंचायत मध्ये व्हावे या अनुषंगाने मंत्रालय आणि विधिमंडळ पत्रकार तथा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य सचिव शाहरुख मुलाणी यांनी उदनवाडी गावास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम भेट दिली आहे.

मुलाणी म्हणाले की, आज गावात उत्कृष्ट काम होत आहे यापेक्षा ही अधिक चांगल्या पद्धतीने व नियमाने कार्य व्हावे. कामात सुसूत्रता यावी आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम भेट देत आहे असे सांगत ग्रामपंचायती मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शासनाच्या योजनांची माहिती त्याचे नियम अद्यादेश याबद्दलची सर्व माहिती सदर पुस्तीकेत देण्यात आली असुन यामुळे ग्रामीण जनतेला याचा निश्चीत फायदा होणार आहे, ग्रामपंचायत अधिनियम पुस्तीका ही खरेतर प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात असणे हे बंधनकारक आहे मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सहसा ही पुस्तीका कोठे दिसत नाही,  यामध्ये ग्रामपंतायतीचे अधिकार,  जनतेचे अधिकार,  शासनाच्या विविध  लोकोपयोगी योजना,  ग्रामपंचायतीला मिळणारा विविध प्रकारचा शासकिय निधी या सर्वांची माहिती असुन यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक सक्षम बनु शकतो असे शेवटी मुलाणी यांनी सांगीतले.

यावेळी ग्रामसेवक सागर आदाटे, सरपंच दत्तात्रेय वाकडे, महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय ग्रंथपाल विठ्ठल वलेकर, प्राध्यापक श्रीकांत वलेकर, पंचायत समिती सदस्य दिगंबर शिंगाडे, तलाठी कुमार राजवाडे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.