कामगार हा अत्यंत कठीण परिस्थितीत उल्लेखनीय काम करून समाजहित जोपासतो – रणजीत राजपूत

0
753
Google search engine
Google search engine

कामगार कल्याण केंद्रातर्फे कर्तृत्वान कामगारांचा सत्कार संपन्न

परळी:- नितीन एस ढाकणे

कामगार हा अत्यंत कठीण परिस्थितीत नोकरी करून उल्लेखनीय काम करतो आणि समाजहित जोपासनेची त्याची धडपड असते अशा कामगारांचा सत्कार करून कामगार कल्याण केंद्र त्यांना प्रेरणा देण्याचे काम करते. असे प्रतिपादन परळी आगाराचे  आगार प्रमुख रणजीत राजपूत यांनी केले.

येथील कामगार कल्याण केंद्रातर्फे परळी विभागातील सहा कर्तृत्वान कामगारांचा जागतिक कामगार दिनानिमित्त सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रम एसटी आगाराच्या सभागृहात संपन्न झाले. यावेळी सहायक वाहतूक अधीक्षक अनिल बिडवे, कामगार संघटनेचे रमेश गीते, गजानन एक्स्ट्रॅक्शन  कंपनीचे गोपाल  टावरी,  केंद्र संचालक आरेफ शेख, जी. एस.  सौंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.  अनेकदा कामगार आपल्या अडचणी, आपले दुःख बाजूला ठेऊन कामाच्या जबाबदारी व्यतिरिक्त समाजासाठी कार्य करत आहे अशा कामगारांचे गौरव होणे ही काळाची गरज असल्याचेही  राजपूत म्हणाले.

कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना उपक्रम व कार्यक्रमांची माहिती प्रास्ताविकात केंद्र संचालक आरेफ शेख यांनी दिली.  उल्लेखनीय काम करणार्‍या कर्तुत्वान कामगारांचा यावेळी स्मृतीचिन्ह,शाल, श्रीफळ व  पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले. यावेळी राज्य परिवहन मंडळातील मंदाकिनी गीते, ज्ञानोबा मुंडे, महावितरण मधील विजयकुमार वरवटकर, वैद्यनाथ शुगरचे सुधाकर घुले, गजानन एक्स्ट्रॅक्शनचे प्रवीण सराफ, महापारेषणचे शिवदास काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणपत मुंडे, धनराज मुंडे, कुणाल गोदाम, सूर्यकांत होळंबे, विकास माळवदे, महादेव चाटे, ज्ञानोबा मुंडे, पांडुरंग गीते, श्रीकांत कान्हेगावकर, बळीराम गीते, भगवान मंडलीक यांच्यासह  कामगार व कामगार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

फोटो क्यापशन… . येथील कामगार कल्याण केंद्रातर्फे मंगळवारी विविध आस्थापनेतील कर्तृत्ववान कामगारांचा कामगार दिनानिमित्त गौरव करताना रणजीत राजपूत,  अनिल बिडवे, उल्हास  शिनगारे, रमेश गीते, जी. एस.  सौंदळे, केंद्र संचालक आरेफ शेख  आहेत आदी.