भूमि अभिलेख कार्यालयाचा  उपअधीक्षक ACB च्या जाळ्यात – २० हजाराची स्वीकारली लाच

0
1578
Google search engine
Google search engine

बुलढाणा :~ खामगाव येथील भूमि अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकाला आज शुक्रवारी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. जिल्हाधिकारी कार्यालयात खरा अहवाल पाठविण्यासाठी उपाधिक्षकाने हि लाच मागितली होती.

खामगावात असलेल्या भुमिअभिलेख कार्यालयामार्फत देण्यात आलेले एका लेआऊट चे अहवाल चुकीचे देण्यात आले होते. सदर अहवाल भुमिअभिलेख कार्यालयाचा उपअधीक्षक व्ही व्ही जाधव यांनी 20 हजार रूपयांची मागणी केली होती. दरम्यान सदर प्रकरणात खामगाव येथील तक्रारकर्ते राजीव देशमुख यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे अपील दाखल केले होते परंतु भुमिअभिलेख कार्यालयातून अहवालासाठी पैशाची मागणी होत असल्याने देशमुख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदविली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने शुक्रवारी सापळा रचुन लाचखोर अधिकारी जाधव याला २० हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले.