शाखा अभियंत्याच्या ऑफीससमोरच वीजचोरी

0
885

अभियंत्यांकडुन कारवाईस टाळाटाळ !

प्रतिनीधी:- दिपक गित्ते

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील महावितरणचे शाखा अंभियंता यांच्या कार्यालयाभोवती आकडे टाकुन अनेक महिण्यापासुन सर्रासपणे वीजचोरी होत असल्याचे दिसुन आल्याने खळबळ उडाली असुन सदरची विजचोरी ही महावितरणच्या अधिकारी यांच्या आर्शिवादाने होत असल्याने विद्युत चोरुन वापर करणाऱ्यावर कारवाई करण्यास महावितरणचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. सदरचा विज चोरीचा प्रकार हा महावितरणच्या शाखा अंभियंत्या यांच्या कार्यालयातुन स्पष्टपणे दिसुन येतो.कार्यालयाला लागुन असलेल्या पुर्व बाजुस महसुल कॉलनी कबीरनगर या भागात मोठया प्रमाणात वीज चोरी असल्याचा व्हिडीओ नुकताच व्हारल झाल्यामुळे वीज चोरीचा प्रकार उघड झाला. वीज चोरी करणार्‍यांमुळे शहरांत वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार होत होते.

वीजचोरी करून त्यावर हिटर, इलेक्ट्रिक शेगडी आदी जादा वीज खेचणारी उपकरणे वापरली जातात. त्यातून अनेकदा आकडे टाकून वीजचोरी करत असल्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. घरामध्ये वीजचोरी करून त्यावर वापरण्यात येणार्‍या विद्युत उपकरणाची माहिती पथकाने घेतली. तसेच, वीज चोरी होत असलेल्या कालावधीची शहानिशा केली. आकडे टाकून वीजचोरी करणार्‍यांमध्ये मीटर बसविलेल्या ग्राहकाचा ही समावेश आहे. जादा वीज बिल टाळण्यासाठी या ग्राहकांकडून आकडे टाकून वीज चोरीचा वापर होत असल्याचे बोलले जाते.

सदर प्रकारबद्दल वरिष्ठ आधिकारी डोळेझाक करीत असल्याने कर्मचारी यांची कार्यवाही करण्यास हिमंत होत नाही.महावितरणने नुकतीच विज चोरी कळवा व लाखो रूपये मिळवा अशी घोषणा केली होती.पंरतु कुंपनच शेत खात असल्याने न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न प्रामाणिकपणे बील भरणारया ग्राहकांना पडला आहे.वीज चोरीचा भ्रुदंड शेवटी सामान्य ग्राहकांनाच सहन करावा लागणार आहे.सदरील प्रकरणात वरिष्ठ अधिकारी शाखा अधिकाऱ्यावर कारवाई करतात का? डोळेझाक करतात याकडे सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष लागले आहे.