एकजुटीनं फुललय रान!डांगरखेडला आलंया तुफान – पाणी फाऊंडेशन अंतर्गत महाश्रमदानात डांगरखेड सरसावले

0
829

आकोटः- संतोष विणके-

आकोट येथून २५कि मी अंतरावर सातपूड्याच्या पायथ्याशी वसलेल्या डांगरखेड येथे वाटर कप स्पर्धेत गावक-यांनी जलसंधारणाचे मोठं काम केले आहे.या अभियानांर्गत ६ मे ला महाश्रमदानात आबालवृद्ध पुरुष महिलांनी कडक उन्हात आपला घाम गाळला.त्यांना समर्थपणे साथ देत लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी ,कर्मचारी शिक्षकवृंद,तथा पाणी फाऊंडेशनचे समन्वयकांसह परिसरातील नागरिक,विविध सामाजिक संघटना पदाधिकारी भारिप बमसचे कार्यकर्त्यांनी सहभागी होवून श्रमदान केले.

महाश्रमदानाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे,उपाध्यक्ष जमीरुल्ला खा पठान,उपविभागिय अधिकारी उदय राजपूत, जि प चे उपकार्यकारी अधिकारी खिल्लारे,जि प सदस्य मंजुषाताई वडतकार ,पं सं सभापती आशाताई एखे, भारिपबमसचे जिल्हा कार्याध्यक्ष काशिराम साबळे, अकोल्याचे डाॕ विनित हिंगणकर ,हरिदास वाघोडे,डाॕ ज्ञानेश्वर मानकर, नरेंद्र काकड,सुमित खंडारे,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा डी आर साबळे,नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर ,पाणी पुरवडा अभियंता रोशन कुमरे.आरोग्य निरिक्षक चंदन चंडालिया , संदिप आग्रे संजय पुंडकर, भारतीय जैन संघटनेचे भारत वसे,आदी मान्यवरांनी श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग घेवून गांवक-यांना प्रोत्साहन देत लोकवर्गणीसाठी आर्थिक सहाय्य केले तर न प शिक्षकवृंदानी ५२हजार रुपये लोकवर्गणीचे स्वरुपात भरिव मदत जाहीर केली.

*अकोल्यावरुन ओझोन मल्टीस्पेशालिटी हाॕस्पीटलचे संचालक डाॕ विनित हिंगणकर व डाॕ. विनोद शर्मा यांचे नेतृत्वाखाली डाॕक्टर्स मंडळीने महाश्रमदानात सहभाग घेतला तथा गावक-यांशी संवाद साधला*

डांगरखेडवासीयांनी लोकसहभागातून जलसंधारणात आघाडी घेवून *पाण्यासाठी सर्वकाही* या जाणिवेचा पाणीदार परिचय घडविल्याबद्दल सर्व मान्यवरांनी कौतुक केले.उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांनी पाणी फाऊंडेशन चे कामासाठी शासन प्रशासन गांवक-यांच्या पाठीशी खंबीरतेने उभे आहे डिझेलसाठी सर्वोतोपरी अर्थ सहाय्य करण्यात येईल असे सांगितले

सर्व मान्यवरांचे स्वागत सरपंच दोलाराम तोटे ,प्रा संदिप बोबडे,मुख्याध्यापक मंगेश दसोडे,सुधाकर पिंजरकर यांनी केले.

*येथे श्रमदान व यंत्राद्वारे २२घनमिटर चर,खोलगट चर,नाला खोलीकरण,दगड मातीचे बांध,मातीचे मोठे बांध,विहीरीचे पुनर्भरण ,शोष खड्डे,वृक्षारोपन याद्वारे येत्या पावसाळ्यात २कोटी लिटर पाणी भूगर्भात जिरविण्याथा येणार आहे त्यातून डांगरखेड शेत शिवारातला डोंगरमाथा हिरवा करुन येथे नंदनवन फुलविण्याचा गांवक-यांचा मानस आहे येत्या २२मे पर्यत स्पर्धेतील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास सर्व यंत्रणा कृतसंकल्प झाल्याचे चित्र दिसून आले.*

महाश्रमदानाला मुख्याध्यापक अंबादास लाघे,मुक्तारशहा,अ आरिफ,आसिफ सर, मन्साराम खोटे,सुधाकर पिंजरकर
,रितेश निलेवार,फैजुल हक,नंदकिशोर नांदुरकर, पळसोदकर, अयुबखान,असलमखान ,मोहीबूर रहमान,मुजूबूर रहमान,नजमुल हुडा,असिम देशमुख ,रघूनाथ बेराड,विजय किलेदार सह नप कर्मचारी ,गावोगांवचे पाणीदार युवक मंडळी अथक परीश्रम घेत सहभागी झाले होते