प्रेमसंबंधातून २२ वर्षीय युवकाचा शेगावात खून आरोपी फरार

0
893
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण / बुलढाणा :-

एका २२ वर्षीय युवकाचा निर्दयी पणे खून केल्याची घटना रविवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात उघडकीस आली. या खुनाच्या घटनेला अंजाम देणारे आरोपी मात्र घटनास्थवरून पसार होण्यात यशस्वी झाले. प्रेमसंबंधातून हि घटना घडल्याचे बोलल्या जात आहे.

शेख शोहेब शेख सलीम वय २२ रा बाजार फैल शेगाव असे घटनेतील मृतकाचे नाव असून सादर युवक हा स्थानिक पेट्रोलपंपावर कामाला होता. यामध्ये रविवारी सायंकाळी तो आपल्या काही मित्रांसोबत जगदंबा चौकातील माउली टॉवर मधील राहुल खंडेराव यांच्या दुकानात चहा आणि सिगारेट पिण्यासाठी नित्यनियमाप्रमाणे गेला होता. दरम्यान दानिश जव्वा शेख नावाच्या इसमाने वाद घालून आपल्या कंदील चाकूने शोएबच्या गळ्यावर वार केले. यात क्षणार्धात दुकानात रक्ताचा सडा पसरला. यामध्ये तो जागीच ठार झाला. दरम्यान आरोपींची घटनास्थवरून पाल काढला. घटनेच्या वेळी दुकानात आरोपी दानिश सोबत आणखी २ युवक होते. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास दाणेदार डी. डी. ढाकणे हे करीत आहेत.