अ.भा. पत्रकार संघटनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी सोरगिवकर तर जिल्हाध्यक्षपदी मेंढे – सर्वच स्तरावरून होत आहे कौतुकांचा वर्षाव

0
616
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी बाळासाहेब सोरगिवकर तर जिल्हाध्यक्षपदी प्रा. रविंद्र मेंढे यांची वर्णी लागली आहे.
चांदूर रेल्वे येथील डॉ. जाजु यांच्या वाडीत अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेची जिल्हास्तरीय बैठक शांततेच्या व खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने हे होते तर विशेष अतिथी म्हणुन केंद्रीय कार्याध्यक्ष मधूसुधन कुलथे, सुरेश सवळे , अशोक पवार , कैलासबापू देशमुख, वसंतराव कुलकर्णी, अशोक राठी, राजेन्द्र भूरे, अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे, युसुफ खान, पवन बैस, अशोक याऊल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मधूसुधन कुलथे यांनी जिल्हा संपर्क प्रमुखपदी बाळासाहेब सोरगिवकर तर जिल्हाध्यक्षपदी प्रा. रविंद्र मेंढे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व निवड पत्र देऊन दोघांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. बाळासाहेब सोरगिवकर व प्रा. रविंद्र मेंढे हे अनेक वर्षांपासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असून पत्रकारीतेच्या माध्यमातुन त्यांनी गोरगरीबांवर होणार्‍या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे. जिल्हयात दोघांचाही दांडगा जनसंपर्क, निष्कलंक चारित्र्य व पत्रकारीतेचा दांडगा व्यासंग या बाबी पाहून त्यांच्यावर कार्यभार सोपविण्यात आला. दरम्यान संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व त्यांनी आपल्यावर ठेवलेला विश्‍वास सार्थ करुन आलेल्या संधीचे सोने करु व या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून जिल्हयातील लहानमोठ्या पत्रकारांचे मजबुत संघटन करुन पत्रकारांचे  विविध प्रश्‍न, समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहु अशी प्रतिक्रिया सोरगिवकर व मेंढे यांनी दिली.
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे जेष्ठ पत्रकार प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे, युसुफ खान, गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, धिरज नेवारे, मनिष खुने, अमोल गवळी, संजय मोटवानी, विवेक राऊत, अभिजीत तिवारी, मंगेश बोबडे, इरफान पठान, अमर घटारे, विनय गोटेफोडे, राजेश सराफी, शहेजाद खान यांसह अनेकांनी कौतुक केले आहे.