महाराष्ट्र शासनाचा आकोटसाठी महत्वपूर्ण निर्णय – आकोट येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन्यास मंञीमंडळाची मंजुरात

0
1057
Google search engine
Google search engine

अकोट – संतोष विणके –

अकोट (जि. अकोला) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास तसेच त्यासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्यासदेखील आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या न्यायालयाच्या स्थापनेमुळे अकोट व तेल्हारा या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांची सोय होणार असून न्यायदानाची प्रक्रिया वेगवान व लोकाभिमुक होणार आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा या तालुक्यांसाठी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास, त्यासाठी आवश्यक पद निर्मिती करण्यासाठी शासनाने मंजुरात देली आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांसाठी अकोट येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापनेसह या न्यायालयासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
हा निर्णय ऐतिहासिक असून यामुळे दोन्ही तालुक्यांतील सामान्यांना याचा लाभ होणार आहे. या उपलब्धीसाठी विधी व न्याय राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असुन यानिमित्य डाॅ. रणजीत पाटील यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.अकोटसाठी विकासपर्व ठरलेल्या या उपलब्धींवर शहरासह जिल्ह्यातील वकीलांनी आनंद व्यक्त केला आहे.यासाठी अकोट वकील संघाने वेळोवेळी ही मागणी केली हे विशेष