आमला विश्वेश्वरमध्ये टँकरने पाणीपुपवठा करावा – सरपंचासह गावकऱ्यांची एसडीओंना निवेदनातून केली मागणी

120
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे १९ सार्वजनिक विहीरी असून त्यापैकी १७ विहीरी कोरड्या झालेल्या आहे. तर २ विहीरीतील पाणी सुध्दा संपण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय घरगुती विहींरीमधील पाणी सुध्दा आटले आहे. ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा सुरू असलेल्या विहीरींमधील पाणी कमी झाल्यामुळे गावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
     तसेच पुढे यापेक्षाही बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कृती आराखड्यात सन २०१८-१९ मध्ये एप्रिल ते जुनपर्यंत टँकरने पाणीपुपवठा करण्याचे सुचविले आहे. त्यामुळे आमला गावाला तत्काळ टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी सरपंचा रजनी मालखेडे, पं.स. सदस्य निलीमा होले, ग्रा.पं. सदस्य विरेंद्र बकाले, राजेश पखाले, दत्तात्रयप्रसाद दुबे, ग्रामस्थ नागेश्वर निकोरे, प्रफुल्ल बकाले, ज्ञानेश्वर मालखेडे यांसह अनेकांनी उपविभागीय अधिकारी यांना बुधवारी दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।