धक्कादायक – ३ मुलांची हत्या करून वडीलांचाही आत्महत्येचा प्रयत्न

0
659

अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धोतरडी येथे वडिलांनीच स्वतःच्या पोटच्या 3 मुलांची हत्या करून स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आता 8 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

अजय इंगळे, मनोज इंगळे आणि शिवानी इंगळे या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला. आत्महत्येच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या विष्णूवर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

विष्णूच्या पत्नीचा मागच्या वर्षीच मृत्यू झाला. मोठा मुलगा अजय वडिलांसोबत मजुरी करायचा, तर मनोज आणि शिवानी शिक्षण घेत होते.