तिवसा पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

0
708
Google search engine
Google search engine

1000 हजार ची स्वीकारली लाच – आरोपी ताब्यात

श्री. मोरेश्वर रामभाऊ शेकार वय ५१ वर्ष, पद- पोलीस हवालदार, वर्ग 0 3 , पोलीस स्टेशन तिवसा अमरावती ग्रामीण यांना ACB ने 1000 ची लाच घेताना अटक केली आहे

तक्रारदाराच्या वडीला विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात योग्य तपास तक्रारदाराच्या बाजूने करून तक्रारदारास न्याय मिळवून देण्याकरता 1000 रुपये लाच रकमेची मागणी करून आज रोजी सापळा कारवाईदरम्यान पंचांसमक्ष लाच रक्कम स्वीकारली

सदरची कारवाई मा.श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, तसेच मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम ,अँटी करप्शन ब्युरो, अमरावती. परीक्षेत्र अमरावती यांचा मार्गदर्शनात श्री – राहुल शिरे पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर उराडे पोलीस निरीक्षक ,पोलीस हवालदार श्रीकृष्ण तालन, झोडपे, पोलीस शिपाई युवराज राठोड, प्रमोद धानोरकर व अभय वाघ तसेच चालक पोलीस नाईक अकबर, लाप्रवि, अमरावती यांनी केली आहे .आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. छाया चित्रीकरण व हैश वैल्यू घेण्यात आली आहे.