चांदूर रेल्वे स्टेशनवर काझीपेठ – पुणे एक्सप्रेसच्या थांब्याचा प्रस्ताव मुख्यालयाने फेटाळला

0
1182
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .)

चांदूर रेल्वे स्टेशनवर काझीपेठ-पुणे या गाडीचा नागपुर रेल्वे बोर्डातुन पाठविलेला प्रस्ताव मुंबई येथील रेल्वे मुख्यालयाने फेटाळल्याची माहिती रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी माहिती अधिकाराच्या पत्रातुन मिळविली.

      पूर्व व पश्चिम विदर्भातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या फार मोठी असल्याने काझीपेठ ते पुणे रेल्वेगाडी दिवाळीच्या शुभमुहुर्तावर सुरू झाली. दिवाळीच्या मुहूर्तावर रेल्वे विभागाने प्रवाशांना दिलेली ही एक मोठी भेट आहे. मात्र या गाडीला चांदुर रेल्वे येथे थांबा नसल्याने तालुक्यातुन काहीसा नाराजीचा सूर आलेला आहे. चांदुर रेल्वे येथे महाराष्ट्र एक्स्प्रेस वगळता पुण्याकडे जाणाऱ्या एकाही गाडीचा थांबा नसल्याने येथे थांबा आवश्यक आहे. कारण पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. रेल रोको कृती समितीची पुण्याला जाण्यासाठी एका रेल्वे थांब्याची मागणी होती. खासदार रामदास तडस यांनी ही रेल्वे बोर्डाला पत्र देऊन पुणे-काझीपेठ या गाडीला चांदूर रेल्वे व हिंगणघाट स्टेशनवर थांबा देण्याची मागणी २० ऑक्टोबर २०१७ ला केली होती. यावरून रेल्वे बोर्डाने २६ नोव्हेंबर २०१७ रोजी दोन्ही स्टेशनवर या गाडीचा थांबा परिचालन दृष्टी ने व्यवहारीक असल्याच्या पत्रासह प्रस्ताव रेल्वेच्या मुंबई मुख्यालयात पाठविला. परंतु मुख्यालयाने ७ मार्च रोजी २०१८ रोजी हिंगणघाट स्टेशनवर थांब्याचा प्रस्ताव मान्य करीत चांदूर रेल्वे स्टेशनवर थांब्याचा प्रस्ताव धुळकावला आहे. सदर माहिती नितीन गवळी यांनी माहितीच्या अधिकारातुन मिळविली.
त्यामुळे ७ महिन्यांपासुन या गाडीचा थांबा मिळवूनच देणार अशी आशा रामदास तडस चांदूर रेल्वे वासीयांना दाखवित होते. परंतु ही आशा आता मावळली आहे.

गरीबरथचा थांबा मिळवून देतो – खा. तडस     

ऐकेवेळी काझीपेठ-पुणे या गाडीला चांदूर रेल्वेत थांबा मिळणारच असे सांगणारे खासदार तडस आता पलटले आहे. एका समारंभात खासदार तडस यांच्याशी स्थानिक पत्रकारांनी याविषयी चर्चा केली व प्रस्ताव फेटाळल्याचे लक्षात आणुन दिले असता तडस यांनी चांदूर रेल्वे स्टेशनवर आता गरीबरथ एक्सप्रेसचाच थांबा मिळवून देणार असल्याचे हास्यास्पद वक्तव्य केले. या वक्तव्यावरून खा. तडस काझीपेठ-पुणे गाडीच्या थांब्याबाबत किती प्रयत्नशील होते हे दिसत आहे.