चांदूर रेल्वे पंचायत समितीमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता  – शिवसेनेचा आपल्या स्टाईलमध्ये तिव्र आंदोलनाचा इशारा

0
697
बीडीओ, तहसिलदारांना दिले निवेदन
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
         चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत बऱ्याच दिवसांपासून अनियमितता दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व मजूराच्या हातांना कामे नाही व रोजगार हमी योजना योजनेच्या कामालाही पंचायत समिती सुरूवात करीत नसल्यामुळे शिवसेनेच्यावतीने गटविकास अधिकारी व तहसीलदार  यांना निवेदन दिले.
         चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत मध्ये घरकुल योजनेचे हजेरी पञक वेळेवर काढुन शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करावी व शासनाकडून मिळवण्यात येणारे घरकुलचे अनुदान तातडीने  देण्यात यावे, २०१२ पासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खचल्या बुजल्या विहिरीचे अपूर्ण कामे त्वरीत पुर्ण करावे, समृद्धी योजनेच्या अंतर्गत नविन विहिरीच्या कामांना त्वरीत पुर्ण करणे, मग्रारोहयो अंतर्गत गुराचे कोठे, शेळीचे शेड व इतर योजनेचा लाभ तातडीने तालुक्यातील जनतेला देण्यात यावा, मजूरांच्या मागणी अनुसार तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत टमध्ये काम तातडीने सुरू करावे, मग्रारोहयो मंजूराचे हजेरी पञक वेळेवर काढुन त्यांना त्यांच्या कामांचा मोबदला त्वरीत द्यावा आदी मागण्यांचा  निनेदनात समावेश आहे. सदर मागण्या सात दिवसात पुर्ण न झाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलमध्ये आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रतिलिपी  जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी जि.प.अमरावती, उपकार्यकारी अधिकारी  (नरेगा) जि.प.अमरावती, उपजिल्हा अधिकारी (नरेगा)अमरावती, दत्ता ढोमणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अमरावती यांना पाठविण्यात आली आहे.
        यावेळी तालुका अध्यक्ष राजेश निंबर्ते, बंडु आंबटकर, कौस्तुभ खेरडे,वगजानन बोबडे, अरूण कावलकर, स्वप्निल मानकर, अशोक पांडे, विजय जयसिंगपुरे, नंदू पुनसे, प्रणव बोके, पुंडलिक जाधव, लखन मेनकेवार, सागर ऊके, कुणाल राजुरकर, गौरव रधाळे व तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.