अखेर दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल – कोतवालावरील चाकु हल्ल्याच्या प्रयत्नाचे प्रकरण

346
जाहिरात
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
      कोतवाल व त्यांचे सहकारी सरकारी कर्मचारी हे सोनगाव फाटा येथे अवैध गौण खनिज वाहतुक तपासणी व नियंत्रण मोहीम बुधवारी राबवित असतांना दोन अज्ञात आरोपी काळ्या रंगाच्या पल्सरने येऊन कोतवालाला जिवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. घटनेची तक्रार बुधवारी दिल्यानंतर चांदूर रेल्वे पोलीसांनी सदर प्रकरण चौकशीमध्ये टाकले होते. परंतु अखेर गुरूवारी दुपारी १२.५० वाजता पोलीसांनी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला आहे.
        तलाठी प्रल्हाद पल्ले, लिपिक मोहन इंगोले, कोतवाल सुमित कदम, कोतवाल विश्वेश्वर पवार हे सर्व कर्मचारी बुधवारी सकाळी ९.४० वाजता सोनगाव चौफुली येथील चेकपोस्टवर गौण खनिज तपासणी अंतर्गत ट्रकची तपासणी करीत असतांना एमएच २७ एक्स ५७८९ या क्रमांकाचा ट्रक आला. त्यांनी या ट्रकला हात दाखवून त्याला थांबविले. सर्वप्रथम तलाठी पल्ले यांनी या ट्रक ची रॉयल्टी तपासली. त्यानंतर लगेच ट्रकवाल्यांचे सहकारी काळ्या रंगाच्या पल्सर गाडीने तेथे आले. कोतवाल विश्वेश्वर विजय पवार (३०) यांना तलाठी प्रल्हाद पल्ले यांनी गाडी मोजण्यास सांगितले. तलाठी पल्ले यांच्या आदेशाने विश्वेश्वर पवार गाडी मोजण्यासाठी जात असतांना पल्सर गाडी घेऊन आलेले इसम यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याजवळ असलेला धारदार चाकू काढून जीवे मारण्याकरिता अंगावर आले. तेव्हा विश्वेश्वर पवार मागे सरकले. नंतर त्यांचे सहकारी कोतवाल सुमित कदम यांनी त्या व्यक्तीचा हात पकडला. यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर सदर युवक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन भरधाव वेगाने निघून गेले. या चेकपोस्टवर घटनेच्यावेळी कोणताही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. या घटनेची लेखी तक्रार कोतवाल पवार यांनी बुधवारी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला दिली होती. परंतु बुधवारी पोलीसांनी सदर प्रकरण चौकशीमध्ये टाकले व गुन्हा दाखल केला नव्हता. अखेर गुरूवारी दुपारी चांदूर रेल्वे पोलीसांनी तक्रार नोंदवून दोन अज्ञात आरोपींविरूध्द कलम भादंवी ३५३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।