अवैध अतिभार रेती वाहतुकीच्या चेकपोस्टवरील ड्युटीवर महसुल विभागातील कर्मचाऱ्यांचा बहिष्कार – जिव धोक्यात घालुन काम करण्यास नकार

357
जाहिरात

कोतवालावरील चाकु हल्ल्याच्या प्रयत्नामुळे घेतला निर्णय

चेकपोस्टवर सन्नाटा

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

        चांदूर रेल्वे येथील सोनगाव चौफुलीवरील चेकपोस्टवर दररोजप्रमाणे बुधवारीही रेतीच्या ट्रकची तपासणी करीत असतांना रेती ट्रकसोबत आलेल्या सहकाऱ्याने एका कोतवावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केला.  या घटनानेमुळे अवैध अतिभार रेती वाहतुकीच्या चेकपोस्टवरील ड्युटीवर महसुल विभागातील कर्मचाऱ्यांनी गुरूवार (ता. १७) पासुन बेमुदत बहिष्कार टाकला असुन जिव धोक्यात घालुन काम करण्यास नकार दिला आहे. याबाबतचे पत्र उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आले.

         अवैध गौण खनिज वाहतूक तपासणी व नियंत्रण या मोहिमेत तहसीलदार, चांदूर रेल्वे यांच्या लेखी आदेशान्वये तलाठी, लिपिक, कोतवाल यांची टप्प्याटप्प्याने सोनगाव चौफुली येथे गौण खनिज तपासणीकरिता ड्युटी लावण्यात आली होती. या ठिकाणी नियमितपणे पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत करणे गरजेचे असतांना याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. एक पोलीस कर्मचारी चेकपोस्टवर कोणत्याही वेळी येत होता व तो ही निशस्त्रधारी. अशातच बुधवारी या ठिकाणी एका ट्रकची रॉयल्टी चेक करून कोतवाल ट्रकमधील रेती  मोजत असतांना सोबत आलेल्या सहकाऱ्याने चाकुने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते कोतवाल पवार मागे सरकल्याने व दुसरे कोतवाल कदम यांनी हल्लेखोराचा हात पकडल्याने अनर्थ टळला. विशेष म्हणजे घटनेच्यावेळी पोलीस बंदोबस्त नव्हता. चेकपोस्टवर पिण्याचे पाणी, सावलीकरीता टेन्ट, नियमितपणे शस्त्रधारी पोलीस कर्मचारी नसतांनाही जिव धोक्यात घालुन काम करावे लागत असल्यामुळे तलाठी संघटना, कोतवाल संघटना, मंडळ अधिकारी संघटना व महसुल कर्मचारी संघटना यांनी संयुक्तपणे तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन या कामावर बेमुदत बहिष्कार टाकल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे गुरूवारी चेकपोस्टवर सन्नाटा पहावयास मिळाला.

            निवेदन देतेवेळी मंडळ अधिकारी संघटना अमरावती अध्यक्ष एस.एस. लंगडे, तलाठी संघटनेचे चांदूर रेल्वे अध्यक्ष कमल गाठे, सचिव पी. व्ही. पिंगरकर, कोतवाल संघटना चांदूर रेल्वे अध्यक्ष छोटु पर्वत, सचिव शरद गाढवे, महसुल कर्मचारी संघटना चांदूर रेल्वे अध्यक्ष अंकुश चौरे, सचिव श्री. भाकरे यांसह सर्व सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।