घरफोडी टाळण्यासाठी अकोट शहर पोलिसांची जागर मोहीम

0
768
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतीनिधी /-

उन्हाळ्याच्या सुटी व लग्नसराईच्या मोसमात घरफोड्यांचे प्रकार दरवर्षी होतात.यापासुन नागरिक सतर्क राहुन सुरक्षित रहावेत म्हणुन अकोट शहर पोलीसांनी काल जनजागृती मोहीम राबवली.लोक ऊन्हाळ्यात घराला कुलूप लावून बाहेरगावी जातात, लग्नाचा मोसम ही उन्हाळ्यात येतो ह्याचाच फायदा चोरटे घेऊन उन्हाळ्यात घरफोडी करतात ,घरफोडी पासून वाचण्या साठी नागरिकांनी काय दक्षता घेणे आवश्यक आहे ह्या विषयी मार्गदर्शक सूचना असलेली 2000 पत्रके अकोट शहर पोलिसांनी शहरात वाटली, तसेच शहराच्या प्रमुख चौकात ह्या सूचना अंतर्भूत असलेले होर्डिंगसही दर्शनी भागात लावण्यात येत आहेत.

घरफोड्या टाळण्यासाठी जनजागृती मोहीम अकोट शहर पोलीस राबवित आहेत, वाढणारे शहर व गस्ती साठी उपलब्ध असणारे अल्प मनुष्यबळाचा विचार करता नागरिकांनी काही सूचनांचे पालन केल्यास घरफोडी पासून त्यांचा बचाव होऊ शकतो. घरफोडी झाल्यास पोलीस आपल्या परीने गुन्हेगार शोधण्याचा प्रयत्न करतातच परंतु नागरिकांनी मेहनतीने कमावलेली संपत्ती चोरा पासून वाचवण्यासाठी काही दक्षता घेव्यात जसे की, बाहेरगावी जातांना घराला कुलूप न लावता विश्वासू माणूस घरी ठेवावा, मौल्यवान दागिने, नगदी पैसे घरी न ठेवता बँकेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे, कॉलनीत ,सोसायट्यांमध्ये CCTV लावावे, बाहेरगावी जातांना आपला संपर्क क्रमांक शेजारी किंवा पोलीस स्टेशन ला देऊन जावा, कुलूप लावण्याचे कामच पडले तर मजबूत कुलूप शक्यतो सेंटर लॉक लावावे, शक्य झाल्यास चौकीदार ठेवावा इत्यादी सूचना असलेली पत्रके शहर पोलीसांनी नागरीकांना वितरीत केलीत .घरफोड्यांपासुन वाचण्यासाठीची ही जागर मोहीम आकोट शहर पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी आभिनव रित्या राबवली. ह्या पञकांवर त्यांनी स्वतः चा व पोलीस स्टेशन चा संपर्क क्रमांक सुद्धा दिला आहे, नागरिकांनी या उपाय योजना व खबरदारी घेउन पोलिसांना सहकार्य करावे व घरफोडी पासून स्वतः चा बचाव करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शहरवासीयांना केले आहे.