ब्रॉडगेज साठी अकोट रेल्वे स्टेशनची इमारत पाडणार- रेल्वे रिझर्वेशन व तिकीट सुविधेला घेऊन प्रवाशी काळजीत

0
885

अकोट – संतोष विणके-

अकोट -अकोला ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणासाठी अकोट रेल्वेस्थानकाची इमारत पाडण्यात येणार आहे .ठेकेदाराने शुक्रवारी या कामाचे भूमिपूजन करुन इमारत पाडण्याच्या कामास सुरुवात केली .

सूत्रांच्या माहितीनुसार ब्रॉडगेज विस्तारीकरण कामात अकोट रेल्वे स्टेशनची नवीन अद्ययावत इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे इंग्रज कालीन असणाऱ्या अकोट रेल्वे स्टेशनचा चेहरामोहराच बदलणार आहे मात्र या कामामुळे अकोट रेल्वे स्थानकावर सद्यस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू असणारे तिकीट काउंटर बंद होते की काय अशी काळजी प्रवाशांना लागली आहे.

ही नविन ईमारत एक वर्षाच्या आत बांधून पूर्ण करावी लागणार असल्याची माहिती सुञांच्या वतीने कळली.सकाळी भूमिपूजन झाल्यावर इमारत पाडकामाला सुरुवात करण्यात आली मात्र मजबूत बांधलेली ही इमारत ही सहजासहजी तुटत नसल्याने मजुरांनी रेल्वे फलाटावरील सिमेंट बाकडे व ओटे तोडण्यास सुरुवात केली.

या ब्रॉडगेज विस्तारीकरणासाठी अकोट खंडवा या मार्गावरील ट्रेन जवळपास दीड वर्ष आधी बंद करण्यात आली मात्र अकोट पुढे या कामास सुरुवात नाही.त्यामुळे इमारत पाडकामातुन रेल्वे प्रवाशांच्या तिकीट सुविधांची सेवा पण रेल्वे विभाग बंद पाडते की काय अशी भीती प्रवाशांना लागली आहे. त्यामुळे रेल्वे विभाग तथा लोकप्रतिनिधींनी आकोट रेल्वे स्टेशन वरील तिकीट काउंटर सेवा बंद होणार नाही याकडे लक्ष घालावं अशी प्रवाशांची मागणी आहे.दरम्यान आकोट रेल्वे स्टेशन बंद करण्यात आले असल्याने याबाबत अधिकृत माहीती देण्यास कुणीही उपलब्ध नव्हते.