अकोल्यात जमली वऱ्हाडातील शेतकऱ्यांची मांदियाळी – राज्यव्यापी शेतकरी तंञज्ञान परीषदेचा समारोप

0
942
Google search engine
Google search engine

अकोला (संतोष विणके )-

शेतकरी संघटनेची राज्यव्यापी तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद विविध आठ ठरावांसह शेतकऱ्यांच्या प्रचंड उपस्थीतीत आज दि.20 ला उत्साहात पार पडली.या परीषदेला विविध मान्यवरांनी हजेरी लावत आपले विचार मांडलेत.

गेल्या काही वर्षातील सातत्याने कमी होत चाललेले कृषी उत्पादन ,शेतमालाची घटती निर्यात गुलाबी बोंड अळीने शेतकऱयाचे होत असलेले नुकसान ई. च्या पार्श्वभूमीवर जगातील प्रतिस्पर्धी देशांच्या शेतकऱ्यांशी स्पर्धा करता यावी या साठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञाना चे स्वातंत्र्य मिळू द्यावे या मागणी साठी वऱ्हाडतील शेतकरी अकोल्यात जमले होते.
निमित्त होते शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषदेचे.
शासकीय धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यांत मोठा ताप निर्माण झाला आहे.असा सूर आजच्या तंत्रज्ञान स्वातंत्र्य परीषदेत उमटला.

तंत्रज्ञानास अडवणूक,बी.टी. च्या ट्रायल्स वर बंदी,कडधान्याची आयात,सरकारी खरेदी चा सावळा गोंधळ,बाजारपेठांमधील वाढता सरकारी हस्तक्षेप या सगळ्यांचा एकत्रीत परीणाम म्हणून शेती उत्पादनात कमालीची घट झाली,शेतमालाचे भाव पडले,तूर,चना सह सर्वच कडधान्याच्या सरकारी खरेदीत प्रचंड नरकयातना शेतकऱ्यांच्या वाटयाशी आल्या.आर्थीक नुकसानासह प्रचंड मनस्ताप शेतकऱ्यांच्या वाट्याला आला.गेल्या हंगामात कापसावर आलेल्या गुलाबी बोन्ड अळी ने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कीटकनाशकांवर प्रचंड खर्च करावा लागला,आर्थीक भूर्दंडासह जीवित हानी ही झाली. अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावे लागले.या पार्श्वभूमीवर बी.टी. च्या ट्रायल्सवर बंदी का? व शेतकऱ्यांच्या अद्यावत तंत्रज्ञान च्या मार्गात अडसर का? हे प्रश्न प्रामुख्याने उपस्थीत झाले आहेत.स्वतंत्र देशात शेतकऱ्याला व्यवसाय सुखाने केंव्हा करता येईल?
उत्तम तंत्रज्ञान व चांगल्या बाजारपेठा मिळवण्याच्या मार्गातील अडसर केंव्हा दूर होतील? हे प्रश्न उत्पादक शेतकऱ्यांना आज भेडसावत असून प्रचलीत धोरणे शेतकऱ्यांचा गळ्या भोवतीचा फास अधीक आवळण्याचेच काम करत आहेत.
जगाचे पोट भरण्याचा व लाज झाकण्याचा व्यवसाय करणारे शेतकरी गुलाम व भिकारी ठेवायचे आहेत का?असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला असून तंत्रज्ञान व बाजारपेठातील सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची सरकारची घोषणा हास्यास्पद ठरत आहे.
शेतकऱ्यांना जगातील उत्तम तंत्रज्ञान व चांगल्या बाजारपेठा उपलब्ध न झाल्यास या पुढे शेतकऱ्यांची चूल पेटणे ही यापुढे मुश्किल होऊन बसणार आहे!
दुसरीकडे तरुण होत चाललेल्या देशात सर्वत्र नोकऱ्या व उद्योग क्षेत्रांत बोंब आहे.,युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण कळसावर असतांना देशातील सर्वात मोठे खाजगी क्षेत्र असलेल्या शेतीला मोकळे पणाचा श्वास घेऊ देणे गरजेचे आहे!
भारतीय शेतकरी जागतीक बाजारात स्पर्धाक्षम होणे यातच शेतकरी,शहरी ग्राहक व एकंदर देशाचे भले आहे!
या सर्व पार्श्वभूमीवर २० मे ला अकोला येथे आयोजीत तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषदेला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट,माजी आमदार ऍड.वामनराव चटप,,माजी अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर,शैलजाताई देशपांडे,महिला आघाडी अध्यक्षा गीता ताई खांदेभराड शेतकरी संघटना तंत्रज्ञान आघाडी चे अजीत नरदे यांचेसह शेतकरी संघटनेच्या प.महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे,युवा आघाडी राज्य प्रमुख सतिष दाणी,यांनी मार्गदर्शन केले. सकाळच्या सत्रात तंत्रज्ञान विषयक चर्चेत तंत्रज्ञान विषयातील तज्ञ डॉ.विलास पारखी,डॉ. शिवेंद्र बजाज,डॉ.दत्तात्रय शिरोळे,डॉ.सुभाष थेटे, डॉ.वृषाली बेडसे यांनी गुलाबी बोन्ड अळी कारण मीमांसा,अद्यावत जी.एम.तंत्रज्ञान ची प्राथमिकता,जागतिक पातळीवर जी.एम.तंत्रज्ञानाची स्थिती,गुलाबी बोन्ड अळी च्या नियंत्रणासाठी उपाय योजनांचा भाग म्हणून एकात्मिक कीड व्यवस्थापन ई. विषयी मार्गदर्शन केले. आहेत.दुसऱ्या सत्रात जेवणानंतर शेतकरी संघटनेचे सत्र पार पडले.
तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषदला राज्य भरातील जाणकार व मोठया प्रमाणात वरहाडातील शेतकरी व शेती व शेतकऱ्यांविषयी आस्था बाळगणारे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट यांनी तर सूत्र संचालन धनंजय मिश्रा यांनी केले.
ठराव,शपथ व घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली