विधान परिषदेकरिता चांदुर रेल्वे केंद्रावर शंभर टक्के मतदान – कॉंग्रेसचा पेंडॉल गायब

0
906
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान) 
   अमरावती जिल्ह्यातून स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत चांदुर रेल्वे मतदान केंद्रावर २४ पैकी २४ मतदारांनी मतदान केल्याने शंभर टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी बी.एस. राठोड यांनी दिली. सदर मतदान तहसिल कार्यालयात संपन्न झाले.
    विधान परिषदेच्या २४ मतदारांमध्ये काँग्रेस १५, भाजप ७, अपक्ष २ असे पक्षीय बलाबल होते. भाजपातर्फे प्रवीण पोटे (पाटील) व काँग्रेसच्या वतीने अनिल माधोगढीया यांच्यात सरळ लढत आहे. दुपारी दीड वाजताच्या सुमारास शंभर टक्के मतदान झाले होते. निवडणूक निरिक्षक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी जयंत जयपूरकर होते. तर निवडणूक सहाय्यक अधिकारी म्हणुन अनिल देशमुख, प्रफुल्ल देशमुख, अंकुश चवरे, शिपाई बाळू इंगोले यांनी काम पाहिले. दरवर्षी मतदाराला गाडीत आणणे, मतदान केंद्रापर्यंत कार्यकर्त्यांच्या गराड्यात आणून सोडणे ही प्रक्रिया या निवडणुकीत आढळली नाही.  निवडनुकी दरम्यानही तहसीलचे कामे नियमित सुरू होते. तहसील कार्यालयात येणारे नागरिक निवडणुकीबाबत अनभिज्ञ होते.
कॉंग्रेसचा पेंडॉल गायब
चांदूर रेल्वे शहरात २४ मतदारांपैकी कॉंग्रेसचे तब्बल १५ मतदार होते. असे असतांनाही शहरात निवडणुकीदरम्यान कुठेही कॉंग्रेस पक्षाचे पेंडॉल आढळले नाही. याशिवाय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह सुध्दा पहावयास मिळाला नाही. या उलट भाजपाचे केवळ ७ मतदान असतांना त्यांचा रविवार सायंकाळपासुनच पेंडॉल दिसता. तसेच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसला. या प्रकारामुळे शहरात सदर निवडणुकीबाबत उलट-सुलट चर्चेंना चांगलेच उधान आले होते.