कर्नाटकात सत्ता स्थापन होताच चांदूर रेल्वेत आनंदोत्सव साजरा – जनता दलाने केली फटाक्यांची आतषबाजी

0
717
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
       जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी कुमारस्वामी यांनी बुधवारी संध्याकाळी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथ घेताच चांदूर रेल्वेत फटाकांच्या आतषबाजीत जनता दल (सेक्युलर) च्या वतीने विजयोत्सव स्थानिक जुना मोटार स्टँड येथे करण्यात आला.
        नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र भाजपाला बहुमत मिळवण्यात अपयश आले होते. त्यानंतर काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी जनता दल सेक्युलर पक्षाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर बुधवारी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ ग्रहण करताच चांदूर रेल्वे तालुक्यातील जनता दल (सेक्युलर) चे कार्यकर्ते हातात ओझेवाली बाईच्या चिन्हाचे झेंडे घेऊन स्थानिक जुना मोटार स्टँड येथे एकत्र आले होते. सर्वप्रथम जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांच्या प्रतिमेस हारार्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. यावेळी जनता दलाचा विजय असो, डॉ. पांडूरंग ढोले अमर रहे, कुुमारस्वामी यांचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यानंतर फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
           यावेळी मित्र पक्षाचे मेहमुद हुसेन, नितीन गवळी, जनता दलाचे गौरव सव्वालाखे, संजय डगवार, अॅड. सुनिता भगत, शोभा मुनकर, शंकरराव आंबटकर, दादाराव डोंगरे, सुधिर सव्वालाखे, महादेवराव शेंद्रे, भिमराव खलाटे, बबवराव मोहोड, रामचंद्र हटवार, साहेबराव शेळके, गोरख नाखले, अंबादास हरणे, प्रकाश बन्सोड, रमेश गुल्हाणे, अशोक हांडे, राजु बद्रे, अवधुत सोनवने, डॉ. अजमिरे, प्रमोद बिजवे, जनार्दन पडधान, धर्मराज वरघट, अशोक रोडगे, देविदास शेबे, दिपक भगत, डॉ. पडोळे, सुनिल हुमने यांच्यासह अनेक जनता दलाचे कार्यकर्ते व मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.