सालोरा खुर्दचे ग्रामसेवक व सरपंच यांचे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी शासन दरबारी पायपीट – चार दिवसापासून पाण्यासाठी सालोरा खुर्द ग्रामस्थांची वणवण.

0
1128
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे : – (शहेजाद खान ) 

चांदूर रेल्वे तालुक्यातील सालोरा खुर्द या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतरही गेल्या चार दिवसापासुन अद्यापही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. गावात तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी गावचे सरपंच, ग्रामसेवक शासन दरबारी पायपीट करीत असल्याचे चित्र आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीत बारा ते पंंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गुंडभर पाण्याकरिता महिलांची पायपीट होत असून मिळेल तेथील पाणी खेड्यापाड्यातील नागरीक वापरत असल्याचे चिञ दिसत आहे. अशातच तालुक्यातील सालोरा खुर्द येथील ग्रामपंचायतीचे संरपच व ग्रामसेेवक यांनी गावांतील मुबलक पाणी असलेल्या विहीरीचे अधिग्रहण केले. परंतु ४५ डिग्रीपर्यंतच्या उष्णतेमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने अधिग्रहण केेेलेल्या विहीरी आता मात्र पुर्णत: आटल्या आहे. सदर स्थिती पाहुन सालोरा खुर्द येथील ग्रामसेवक केेेणेे यांनी पंंचायत समिती कार्यालयात पञ देऊन ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीत आवश्यकतेनुसार टँँकरने पााणीपुरवठा करावा असेे पञ २४ एप्रिल रोजी दिले. या पञावरून पंंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी तहसीलदार यांच्याकडे पञ पाठविले. तहसिल कार्यालयामार्फत ११ मे रोजी जिल्हाधिकारी यांना पञ पाठविले. सदर पञातील पाणी टंचाई विषयाची गंभीरता पाहता शासन निर्णय क्रमांक टंंचाई ३०९९/प्र का.१२/पा.पु.१४/दि.१ फेब्रुवारी १९९९ यांना मिळालेल्या अधिकारनुसार जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी १९ मे रोजी तातडीने आदेश दिले. दिलेल्या आदेशात उपकार्यकारी अभियंता,  अमरावती यांना तात्काळ सोलोरा खुर्द या गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा असा आदेश दिले. परंतु चार दिवसानंतरही टंचाईग्रस्त गावाला व ग्रामस्थांना शासनाने पाणीपुरवठा केला नाही. ही बाब अतिशय गंभीर असून प्रशासनातील अधिकारी या विषयावर कुंभकर्णी झोप घेतले असल्याचे दिसुन येत आहे.