चांदूर रेल्वे तहसील कार्यालयात ‘स्वच्छ भारत अभियानाचे’ वाजले तिन तेरा! – प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार…!

0
846
Google search engine
Google search engine
प्रसाधन गृहात घाणीचे साम्राज्य
स्वच्छता गृहात नाही पाण्याची व्यवस्था
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
शासनाचे वतीने  “स्वच्छ भारत अभियान” मोठ्या जोमाने राबविल्या जात आहे. मोठमोठे फलक लावून स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र शासनच जर याकड़े दुर्लक्ष करेल तर भारत स्वच्छ कसा होईल? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. चांदूर रेल्वे तहसील कार्यालयात स्वच्छ भारत अभियानाचे तिन- तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. अर्थातच दिव्याखाली अंधार म्हणावे अशी स्थिती निर्माण झाली आहे.
     तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांचे करिता प्रसाधन गृह अटैच बाथरूम आहे. सदर प्रसाधन गृहाची पाहणी केली असता याठिकाणी अस्वछतेचा प्रकार उघडकिस आला आहे. येथील साफसफाई महीनों गिनती होत नसल्याचे ऐका कर्मचा-याने सांगितले. स्वच्छतागृहात पानी नसल्याचेही प्रत्येकक्षरित्या आढळले. त्यामुळे बाहेर लागलेल्या ठंड पिण्याच्या पाण्याचा उपयोग काही कर्मचारी स्नच्छतागृहासाठी घेत आहेत. लघुशंका करिता जात असलेले कर्मचारी तोंडावर रुमाल बांधून जात असल्याचे चित्र आहे. कारण ठिकाणी घाण एवढी साचली आहे कि दुर्गंधी सहन होत नसल्याने अनेकांना वाणत्या होत असल्याचे समजते. अधिकारी यांचे मात्र या समस्येकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.चांदूर रेल्वे तहसील मधील स्वच्छ भारत अभियान केवळ कागदोपत्री आहे.
        तहसील कार्यालय जर अस्वच्छता दाखवत असेल तर गावाला काय स्वच्छतेचा धड़ा देईल? असा सवाल देखील येथील सामाजिक संघटनांनी केला. तहसील कार्यालयात जवळपास ६ ते ७ विभाग येत असून अंदाजे शंभरच्या वर कर्मचारी आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय सुद्धा याच इमारतीत आहे. कर्मचा-यांच्या स्वच्छता गृहाची दुरावस्था आढळली, मात्र अधिकारी यांच्या स्वच्छता गृहाला कुलुप असल्याने याची पाहणी करता आली नाही. शासनाने दिलेल्या भारत स्वच्छ मिशन ला अधिकारीच बगल देत असल्याने आता स्वच्छ भारत अभियानावर प्रश्न चिन्ह लागले आहे. आता तरी चांदूर रेल्वे तहसील कार्यालयातील प्रसाधन गृहात स्वच्छता अभियान राबविल्या जाते की नाही या कड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.