कडेगांव नगरपंचायतीवर संतप्त महीलांचा घेराव

0
783
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगाव/हेमंत व्यास :-

कडेगाव शहरास गेली महीनाभर दुषित पाणी पुरवठा होत असल्याने वारंवार तक्रार करूनही नगरपंचायत कोणतीही कारवाई करत नाही कडेगाव शहरास लघुपाटबंधारे तलावातुन पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत आहे पण नगरपंचायतीने या तलावातील पिण्याचे पाणी राखुन ठेवले नाही त्याचाच परिणाम शहराला दुषित पाणी पुरवठा करावा लागला हा पाणी पुरवठा शुध्द स्वच्छ व सुरलीत व्हावा म्हणुन नगरपंचायतीला निवेदनही दिले परंतु नगरपंचायत प्रशासनाने या निवेदनाला केराची टोपली दाखवली त्यामुले शहरास गढुल व दुषित पाणी पुरवठा केला त्यामुले शहरात रोगराईच्या प्रमाणात वाढ झाली त्यावर उपाय योजना करण्याची गरज असताना हे नगरपंचायत प्रशासनच कोमात गेल्याचे दिसुन आले

त्यामुळे कडेगाव शहरातील संतप्त महीलांनी नगरपंचायतीत दुषित पाण्याच्या बाटल्या घेवुन मुख्याधिकारी चरण कोल्हे यांना घेराव घातला व दुषित पिण्याचे पाणी पीण्यासाठी जोरदार हल्लाबोल केला महीला ईतक्या संतप्त होत्या की नगरपंचायतीला कडेगाव पोलिसांची मदत घ्यावी लागली वास्तविक गावाचे गांभिर्य लक्षात घेवुन सन्माननिय सत्ताधारी नगरसेवकांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी नगरपंचायतीत हजर असावयास हवे होते दुसरीकडे मात्र सामाजिक कार्यकर्ते डी एस देशमुख शांताराम दिक्षित राजाराम माली यांनी शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी बेमुदत उपोषण चालु केले होते त्याही उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नाही म्हणुन कडेगावातील शेतकरी व ग्रामस्थानी प्रशासनाच्या विरोधात विजापुर गुहागर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले कडेगावचे नायब तहसिलदार राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत टेंभु योजनेचे कार्यकारी अभियंता श्री रेड्डीयार व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी आदोलन कर्ते व उपोषणकर्त्याच्या मागण्या केल्यानंतर बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.