52 वर्षा पासून मुक्या जणावरांसाठी मुबलक पाण्याची सोय – युवा शेतकरी आंनद खाबिया यांनी जोपासली जुन्या पिढ्ढीची परंपरा.

0
864
Google search engine
Google search engine
भिषण पाणी टंचाईत ही मुक्या जणांवरासाठी सदैव मुबलक पाणी.
चांदूर रेल्वे  (शहेजाद खान) –
          चांदूर रेल्वे पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या कवठा या गावात लहानुजी महाराज विद्यालयाला लागूनच आंनद नेमिचंद खाबिया यांची संञाची बाग असून या बागेत स्व.माणकचंद कपुरचंद खाबिया यांनी 1966 साली शेतात विहिरचे बांधकाम केले होते. या विहिरीवर परीवारीत सर्वांचे नाव व ओम नमः शिवाय लिहिले असून विहिरचे निर्माण वर्षे ही लिहिले आहे. सोबत गावातील व परीसरातील मुक्या जणांवर करीता पिण्याच्या पाण्याची सोय आजिवन व्हावी म्हणून शेतात 1967 साली जणावरांच्या पिण्याच्या टाक्याची व्यवस्था केली आहे. स्व.माणकचंद कपूरचंद खाबिया यांनी कवठा कडू या गावात सुरू केलेली सेवा आज ही त्यांचे नातू कृषी व्यवसायिक आंनद खाबिया यांनी आज ही सुरू ठेवली आहे.
                      आज एकीकडे ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी वणवण फिरत आहे,मिळेल त्या ठिकाणांहून पाणी आणून पाण्याच्या टंचाईवर मात करत असल्याचे चिञ दिसून येत आहे. अश्यात मागिल सतत 52 वर्षा पासून मुक्या जणावरांसाठी सेवा देणारे हे शेतकरी कधिच प्रकाश झोतात आले नाही. कारण दान करत असतांना असे म्हणतात की एका हाताने केलेले दान हे दुसऱ्या हाताला माहित पडायला नको. परंतु खऱ्या मनाने व निस्वार्थपणे सेवा देणारे युवा समाजसेवक आंनद खाबिया यांनी केलेली सेवा इतर युवकांना प्रेरणादायी ठरावी व चांगल्या कामचे कौतुक झाले की करण्याचाही उत्साह वाढतो व जास्तीत जास्त युवक अश्या समाजसेवेला पुढे येतात.
                            आज संपूर्ण गांव पाणी टंचाईच्या समस्येत आहे तर दुसरीकडे खाबिया सारखे युवा शेतकरी आपल्या शेता समोरील पाण्याचे हौद भरण्यासाठी कधिच थांबले नाही. त्यांना माहित आहे की मुके जणावर मोठ्या आशेने पाणी पिण्यासाठी या ठिकाणी येतात जर या जंणावराना पाणी मिळाले नाही तर मुक्या प्राण्यांची वणवण होईल व या तहानलेल्या जिवांचा आशीर्वाद आपल्या मिळणार नाही, या पेक्षा मोठे दुर्दैव दुसरे नाही, म्हणून कवठा या गावात आजही जणावरांसाठी पाणी खाबिया यांच्या शेतात आहे. व ही सेवा पिढ्यांन पिढ्या पासून सुरू आहे व ती अशीच सुरू राहील.