पेट्रोल डीझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचा रस्ता रोको

0
1668
Google search engine
Google search engine

 

 

अनिल चौधरी, पुणे :-

 इंधन दरवाढीविरोधात सर्वसामान्य वाहनचालकांकडून ओरड होत असतानाच सलग 15 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महागतच आहेत. दररोज पेट्रोल डीजेल दर वाढतच आहे , या दरवाढी मुळे सर्व सामान्य जनता हैराण झाली आहे. या दरवाढीच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पुणे शहर व हडपसर मतदार संघाच्या वतीने मा.आ.महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली घोडयावर फेरी मारून विकास बधे, गणेश कामठे महादेव बाबर, घुले ताई या शिवसैनिकांनी अनोखे आंदोलन करत कोंढवा भागातील खडी मशीन चौकात सरकारच्या विरोधात घोषणा देऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

    वाढलेल्या इंधन दरवाढी विरोधात मा.आ.महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली खडीमशीन चौकात हडपसर मतदार संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना महादेव बाबर यांनी केंद्र सरकारचा भरपूर समाचार घेतला तसेच स्थानिक आमदाराच्या कारभारा विरोधात जोरदार टीका-टिप्पणी केली.

 

  पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवरही झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत आहेत. यावेळी बोलताना शिवसेना नेते गंगाधर बधे म्हणाले ,
मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी इंधनदराबाबत लवकरच दीर्घकालीन उपाययोजना आखण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकारी पातळीवर इंधनदर कमी करण्याबाबत घोषणा होत असल्या तरी अंमलबजावणी शून्य असल्याचं दिसून येत आहे.पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. परंतु दरांवर नियंत्रण आणण्यात सरकारला आतापर्यंत यश आलेलं नाही. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. यावेळी विकास बधे यांनी देखील भाजपच्या पेट्रोल डीजेल दरवाढीचा निषेध व्यक्त केला.

याप्रंगी महिला शिवसेना शहरप्रमुख नगरसेविका संगीताताई ठोसर, मा.नगरसेवक भरत चौधरी, विजय देशमुख, गंगाधर बधे, विकास बधे, मच्छिंद्र दगडे, अमोल हरपळे, किरण ठोसर,प्रवीण ठोसर, गणेश कामठे , सागर कामठे, समीर तुपे, दीपक घुले, अंबादास शिंगे, भरत शेंडकर, माऊली भोईटे, शंकर लोणकर, सचिन कापरे, राम खोमणे, सुनील कामठे व शिवसैनिक मोठ्या प्रामाणात उपस्थित होते.