कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान रद्द झाले नाही – जिल्हाधिकारी ><>< नागरिकांनी पॅनिक होऊ नये - अफवांवर विश्वास ठेवू नका

0
955
Google search engine
Google search engine

भंडारा :-

 

भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीमध्ये गोंदिया विधान सभा क्षेत्रातील 35 ठिकाणी फेरमतदान घेण्याचे वृत्त काही वाहिन्यावर प्रसारित झाले आहे. असा कुठलाही निर्णय निवडणूक आयोगाने घेतला नसून लोकसभा मतदार संघातील कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान रद्द झाले नाही. तसेच नव्याने मतदान घेण्यात येणार नाही. सहाय्यक निवडणूक अधिकारी गोंदिया विधानसभा यांना निवडणूक रद्द करणे किंवा फेरमतदान घेणे यासंबंधीचा अधिकार नाही, असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिले. आपण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत वळसकर यांच्याशी दुरध्वनीद्वारे‍ चर्चा केली असून असा कुठलाही निर्णय घेतला नाही अशी माहिती उपविभागीय अधिकारी अनंत वळसकर यांनी दिल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.