‘जागो मोहन प्यारे’ ने नाट्यरसिकांना रिझवले >< दोन अंकी नाटक, - पी के एम चे आयोजन

0
1395
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे :- (शहेजाद खान) 
      पीपल्स कला मंच या सांस्कृतिक चळवळीला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त संस्थेच्या आजमाजी कलावंतांनी एकत्र येऊन प्रियदर्शन जाधव मुंबई लिखित ‘जागो मोहन प्यारे’ या दोन अंकी नाटकाचे आयोजन  स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुल च्या रंगमंचावर केले होते. केवळ पिकेएम परिवारासाठी या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नाटकच्या अप्रतिम सादरीकरणाने नाट्यरसिकांना रिझविले.
       पिकेएम चा सदस्य असलेला व सध्या मुंबई येथे चित्रपटात व टीव्ही मालिकांमधून पुढे येत असलेला अनुज ठाकरे या कलावंताची मुख्य भूमिका या नाटकात होती. नाट्य चळवळीला 20 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष विवेक राऊत, सिद्धार्थ भोजने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 15 दिवस एकत्र येत शहरातील सर्व कलावंतांनी नाटक, डान्स, व शॉर्टफिल्म ची निर्मीत केली. या सादरिकरणाच्या प्रसंगी विचारमंचावर नाट्य चला चळवळीचे प्रा. प्रसेनजीत तेलंग, पिकेएम चे माजी सदस्य सचिन बोबडे, वैशाली राऊत, मंगेश उल्हे, मनीष हटवार उपस्थित होते. नाट्यकलावंत म्हणून अनुज ठाकरे, अमर इमले, प्रतीक्षा पोकळे,  सोनाली चतुर, दिपीका चतुर, दीपक नांदगावकर, अंकुर धाकुलकर, मयूर शिदोडकर, निलेश महुकार, तेजस इमले आदींनी भूमिका साकारल्या. सुरवातीला एजाज हुसेन याच्या सुमधुर गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. सोबतच पिकेएम कलावंतांचे नृत्य हि सादर झाले.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल जगताप, अमर घटारे, भूषण सरदार, बिपीन लांडगे, प्राविण्य देशमुख, दीपिका आयटे, दिक्षा खांडेकर, पंकज कणसे, गोपाल मुंधडा, पल्लवी पत्रीकर, अमोल म्हसतकर, तेजस लहाने व सर्व पिकेएम सदस्यांनी सहकार्य केले. प्रेरणा वानखडे हिने संचालन तर रोहित तिजारे यांनी आभार मानले.