हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत ! – केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांची टिंगळटवाळी !

0
1434
Google search engine
Google search engine
नवरात्रीशी साधर्म्य असणारे सलमान खान निर्मित ‘लव्हरात्री’ या आगामी चित्रपटाचे नावच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. नावावरून चित्रपटाचे कथानकही नवरात्रीदरम्यानच्या प्रेमकथेविषयी असणार, हे स्पष्ट आहे. हा चित्रपटही नवरात्रीच्या तोंडावरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्षेप नोंदवून चित्रपटाचे नाव पालटण्याची मागणी केली आहे.
केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांची टिंगळटवाळी !
 
      पीके, रामलीला, बाजीराव-मस्तानी, पद्मावती, ओह माय गॉड, स्लमडॉग मिलिअनेर, सिंग इज किंग, ३ देव – अंडरकव्हर भगवान यांसारख्या चित्रपटांनंतर आता ‘लव्हरात्री’ चित्रपटातून हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवल्या जाणार आहेत. ख्रिसमसच्या धर्तीवर किसमस वगैरे चित्रपट काढण्याच्या कल्पना कुणाच्या डोक्यात येत नाहीत.  भगवान शिव आणि श्रीक्षेत्र काशी यांचे विडंबन करणारा ‘मोहल्ला अस्सी’ असो, ‘अयोध्येतील रामजन्मभूमीवर कोणतेही मंदिर नव्हते. तेथे नंतर मूर्ती ठेवण्यात आल्या’, अशी आक्षेपार्ह मांडणी करणारा ‘गेम ऑफ अयोध्या’ असो, ब्राह्मण समाज आणि पुरोहित, तसेच श्राद्धविधी यांची निंदा करणारा ‘दशक्रिया’ असो, समलैंगिक नायकाला वीर हनुमानाच्या मुद्रेत दाखवणारा ‘बॉडीस्केप्स’ असो वा भगवान शिवाच्या वेशात दुचाकीवर बसल्याचे दृश्य असणारा ‘बहन होगी तेरी’ असो ! चित्रपटांच्या माध्यमातून केवळ हिंदूंच्या सहिष्णूतेचा (षंढपणाचा) अपलाभ घेऊन यथेच्छ टिंगलटवाळी करणारी मंडळी अन्य धर्मियांच्या आस्थांच्या संदर्भात मात्र चकार शब्द काढत नाहीत. तिहेरी तलाक प्रथेवर कोरडे ओढणारा ‘हलाल’ आणि येशूचे प्रेम असलेली स्त्री असलेला ‘द दा व्हिंची कोड’ हे चित्रपट या देशात विशेष चालत नाहीत. ‘सेक्सी दुर्गा’ चित्रपट काढू धजावणारे ‘सेक्सी मेरी’ अथवा ‘सेक्सी आयेशा’ चित्रपट बनवत नाहीत. हिंदूंचा असंघटितपणा हेच याचे कारण आहे. हिंदूबहुल देश असूनही सनातन हिंदु धर्मास प्रतिष्ठा नसल्याने कुणीही यावे आणि श्रद्धास्थानांचा अवमान करून जावे, अशी स्थिती आहे. 
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे नवरात्रीचा चुकीचा अर्थ 
‘लव्हरात्री’ चित्रपटामुळेही तरुणांवर दूरगामी नकारात्मक परिणाम होण्याची चिन्हे आहेत. नवरात्रीत नऊ दिवस देवीची उपासना करायची असते. या नऊ दिवसांमधील प्रत्येक दिवसाचे शास्त्र आहे. या दिवसांमध्ये खेळला जाणारा गरबा हा काही मौजमजेचा नाच नसून त्यालाही आध्यात्मिक अर्थ आहे. पूर्वी गरबा नृत्याच्या वेळी देवीची, कृष्णलीलेची किंवा संतरचित गीतेच म्हटली जात असत. चित्रपटांतील गीतांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करून टिपर्‍या खेळणे म्हणजे गरबा नव्हे. भगवंताच्या या सामूहिक नृत्योपासनेला आज विकृत स्वरूप आले आहे. या उत्सवामध्ये अपप्रकार शिरले आहेत. या काळात मुलींसह नाच करण्याच्या निमित्ताने त्यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ‘लव्ह जिहादी’ या काळात विशेष कार्यान्वित होत असल्याचे दिसून येत होते. अशांना अटकाव करण्यासाठी २-३ वर्षांपूर्वी गुजरातमधील नवरात्रोत्सव मंडळांनी अन्य धर्मियांना गरबा खेळण्यासाठी प्रवेश नाही, मंडपात प्रवेश करतांना टिळा लावून आणि गोमूत्र शिंपडून यावे, अशी अट घातली होती. नवरात्रीच्या काळात गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत अनुमाने ३५ टक्के वाढ होत असल्याच्या बातम्याही गेली 2 वर्षे प्रसिद्ध होत आहेत. हिंदूंच्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळे उत्सवांना कसे विकृत स्वरूप येत चालले आहे, हे यातून दिसून येते. ‘लव्हरात्री’ चित्रपटातून नवरात्र या पवित्र उत्सवाला गालबोट तर लावले जातच आहे, याशिवाय या निमित्ताने हिंदूंच्या धार्मिक कृत्यांचा अयोग्य अर्थ तरुणांच्या मनावर बिंबण्याचाही धोका आहे. अशी स्थिती असतांना या अपप्रकारांना प्रोत्साहन देणारा चित्रपट प्रदर्शित होऊ देणे म्हणजे युवकांच्या अधःपतनाला हातभार लावण्यासारखेच आहे. हिंदुत्वनिष्ठांचा चित्रपटाला आक्षेप आहे, तो या सर्व कारणांमुळे. 
हिंदूंची भूमिका 
      अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपट कलाकारांकडून हिंदूंच्या देवता, मंदिरे, साधू, सण-उत्सव यांवर वारंवार टिंगलटवाळी केली जाते. या विरोधात संघटितपणे आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. ‘सहिष्णूतेचे डोस पाजून कुणी श्रद्धास्थानांचा अवमान सहन करण्यास सांगत असेल, तर ते आता खपवून घेतले जाणार नाही. देव, धर्म आणि देश यांच्या रक्षणासाठी प्रसंगी प्राणार्पण करण्याची शिकवण आमच्या राष्ट्रपुरुषांनी दिली आहे. त्यांच्या बलिदानामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत कुणी मनोरंजनाच्या नावाखाली देवाधर्माची टिंगलटवाळी ‘एन्जॉय’ करत असेल, तर त्याविरुद्ध धर्मभावना दुखावण्याबद्दल कायदेशीर कारवार्इ झाली पाहिजे. जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रयत्नांना चाप लावायचा असेल, तर या संदर्भात हिंदूंना पुन्हा एकदा व्यापक आंदोलन उभे करण्याची आज आवश्यकता आहे.