महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
1639
Google search engine
Google search engine

मुंबई : -महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे ते ६७ वर्षाचे होते.

हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना आज पहाटे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

अस्वस्थ होत असल्याने पांडुरंग फुंडकर पहाटे चार वाजता उठले. त्यानंतर त्यांना उलटी झाल्याने, त्यांनी सुरक्षारक्षकांना उठवलं. त्यांच्या घरी कोणीही नव्हतं. त्यामुळे सुरक्षारक्षकांनीच त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र वाटेतच त्यांना हार्टअटॅक आल्याचं सांगण्यात येत आहे.