चांदूर रेल्वे नगर परीषदेचे नगरसेवक मौज-मस्ती साठी जम्मू-कश्मीरमध्ये >< मात्र चांदूर रेल्वे शहरात 'अंधेरा कायम रहे'

0
609
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
       टीव्ही सिरियल ‘शक्तिमान’ ९० व्या शतकातील सर्वांत प्रसिध्द शो होता. बालकांपासुन ते वृध्दांपर्यंत प्रत्येकजण याचा फॅन झाला होता. यामधील शक्तीमान सोबत विलेन किलविश सुध्दा दमदार होता. किलविश चा एक डॉयलॉग ‘अंधेरा कायम रहे’ प्रत्येक बालकांच्या तोंडामध्ये राहत होता. हाच डॉयलॉग आता चांदूर रेल्वे शहरवासीयांना सुध्दा नक्कीच आठवत असेल. कारण गेल्या एका वर्षांपासुन शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. व न.प. तर्फे दुषीत पाण्याचा  पाणीपुरवठा सुध्दा होत असतांना मात्र चांदूर रेल्वे नगर परीषदेचे नगरसेवक मौज-मस्ती साठी जम्मू -काश्मीरमध्ये परिवारासह गेल्याची चर्चा गल्ली-गल्लीत धडाक्यात सुरू आहे.
         चांदूर रेल्वे शहरात गेल्या अनेक दिवसांपासुन पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. दुर्गंधीयुक्त, अळ्या असलेला पाणीपुरवठा शहरवासीयांना नगर परीषदतर्फे सुरू आहे. यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच रेल्वे स्टेशन ते सिनेमा चौकापर्यंत दुभाजकावरील पथदिवे गेल्या एका वर्षांपासुन बंद आहे. त्यामुळे चांदूर रेल्वे शहरात अंधाराचे साम्राज्य निर्मान झाले आहे. चांदूर रेल्वे शहरात अशा प्रकारच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. परंतु अशाही परिस्थितीत नगर परीषदेचे सत्ताधारी व विरोधक पक्षाचे नगरसेवक जम्मू-काश्मीर मध्ये प्रशिक्षण शिबीराच्या नावाखाली मौज-मस्तीसाठी फिरायला गेल्याची चर्चा शहरात चौका-चौकात रंगु लागली आहे. शहरवासीयांच्या सेवेसाठी असलेले नगरसेवक शहरातील समस्या वाऱ्यावर सोडून फिरायला जाणे कितपत योग्य ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या जम्मू-काश्मीर दौऱ्यासाठी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व ३-४ नगरसेवक अपवाद ठरले आहे. नगरसेवक प्रशिक्षणातुन काय साध्य करतात हे समजण्यापलीकडे आहे. आजपर्यंत ज्या नगरसेवकांनी अशाप्रकारचे प्रशिक्षण दौरे केले त्याचा शहरवासीयांना कुठेच फायदा झालेला नाही. न.प. बजेटमध्ये अशा प्रशिक्षणासोबत वृक्षारोपन बजेट, क्रिडा महोत्सव बजेट, अपंग निधी बजेट अशा महत्वपुर्ण बजेटकडे दुर्लक्ष करून शहरातील नगरसेवक जम्मू काश्मीरमध्ये प्रशिक्षणासाठी गेले. नगरसेवक परिवारासह व तेही चक्क पर्यटन स्थळी म्हणजेच जम्मू-काश्मीरमध्ये खरंच प्रशिक्षणासाठी गेले की केवळ सहसीसाठी गेले यावरून चर्चेच्या माध्यमातुन अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहे.
आता कुठे गेले पत्र देणारे लोकप्रतिनीधी
मागील पंचवार्षिकमध्ये स्थानिक नगर परीषदमध्ये भाजपाची पहिल्या अडीच वर्षात सत्ता होती. त्यामुळे शहरातील कोणतेही पथदिवे बंद असल्यास विरोधी नगरसेवक पत्र न देता थेट सदर कॉंग्रेसचे लोकप्रतिनीधी पत्र देत असल्याचे म्हटल्या जाते. परंतु आज नगर परीषदमध्ये स्वत: च्या पक्षाची सत्ता असतांना शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद मागील एका वर्षापासुन बंद आहे. आता मात्र एकही पत्र दिले नाही. त्यामुळे पत्र देणारे लोकप्रतिनीधी आता गेले तरी कुठे असा प्रश्न शहरवासी विचारत आहे. 
नगरपरिषदसमोरील लाईट बंद 
एकीकडे नगरसेवक जम्मू काश्मीर टूरवर गेले असतांना पथदिव्यांच्या बाबतीत मात्र कमालीचे दुर्लक्ष केले आहे. शहरातील तर सोडा चक्क नगर परीषद गेटसमोर असलेला एक लाईट गेल्या अनेक दिवसांपासुन बंद आहे. असे असतांनाही संबंधित कंत्राटदारांचे देयके मात्र बरोबर निघत असल्याची माहिती मिळाली आहे.
नगरसेवक प्रशिक्षणासाठी गेले – सिओ पाटील
सदर नगरसेवक जम्मू-काश्मीरला प्रशिक्षणासाठी गेले आहे. नगरसेवकांच्या प्रशिक्षणाची तरतुद बजेटमध्ये असल्याचे मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांनी सांगितले.